अजंता एक्स्प्रेस भुसावळपर्यंत येणार

0

आ. संजय सावकारे यांच्या पाठपुराव्याला यश
भुसावळ, दि. २५ –

भुसावळसह भुसावळ विभागातील नागरिकांसाठी रेल्वे गाडी क्रमांक नं. १७०६३/६४ मनमाड सिकंदराबाद अजंता एक्सप्रेस आता मनमाड ऐवजी भुसावळ पर्यंत करुन तिला थांबा देण्यात आला आहे. आ. संजय सावकारे यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा  हे भुसावळ रेल्वे विभागाच्या दौर्‍यावर आले असतांना त्यांच्याकडे मागणीवजा पाठपुरावा केल्यामुळे आ. संजय सावकारे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
मध्य रेल्वेचे व्यवस्थापक डी.के.शर्मा हे नुकतेच भुसावळ विभागाच्या दौर्‍यावर आले असता आमदार सावकारे यांनी त्यांची  सदीच्छा भेट घेतली होती. या भेटीत आ. संजय सावकारे यांनी रेल्वे विभागातर्फे करण्यात येत असलेल्या विविध कामांबाबत रेल्वे विभागाचे कौतुक केले. तसेच मनमाड-सिंकदराबाद एक्सप्रेस ही गाडी भुसावळ येथून चालविण्यात यावी जेणेकरुन भुसावळ येथून हैदराबाद जाण्या-येण्याची गैरसोय दूर होईल. अजमेर येथे जाण्या-येण्यासाठी बायपास जाणार्‍या रेल्वे गाड्या भुसावळ स्थानकापर्यंत आणण्यात याव्यात, नवीन रस्ते आदी विविध मागण्या केल्या होत्या. महाव्यवस्थापक श्री.शर्मा यांनी भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक आर.के. यादव यांच्याशी चर्चा व माहिती घेऊन मागण्यांबद्दल सकारात्मक निर्णय घेण्यात येईल,असे आश्वासन आ. सावकारे यांना दिले होते. या बाबींचा आ. संजय सावकारे यांनी पाठपुरावा केल्याने दि.२३ रोजी आ. संजय सावकारे यांना रेल्वे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांच्या आलेल्या पत्रानुसार ते मनमाड सिकंदराबाद अजंता एक्सप्रेसचा पल्ला मनमाड ऐवजी भुसावळपर्यंत वाढविण्याबाबत तपासणी करुन गाडी सुरु करणार असल्याचे त्यांनी कळविले आहे. ही गाडी सुरु झाल्यावर खान्देशातील प्रवाशांना मराठवाडा, अजंता गुहा येथे सरळ रेल्वेने जाता येणे शक्य होेणार आहे.आ. सावकारे यांच्या या पाठपुराव्याचे कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.