अंबुजा कंपनीच्या सोबत 1111 कुटुंबांना किराणा

0

एरंडोल  प्रतिनिधी

चाळीसगाव प्रतिनिधी – चाळीसगाव परिमंडळचे अपर पोलीस अधीक्षक  सचिन गोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे यांचे मार्गदर्शनाखाली, चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोनि विजयकुमार ठाकूरवाड व त्यांचे सहकारी सपोनि आशिष रोही, मयूर भामरे, पोउपनि महावीर जाधव व विजय साठे, डी बी प्रमुख बापूराव भोसले, गोपनीय शाखेचे गणेश पाटील, पंढरीनाथ पवार  चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन कर्मचारी यांनी

कोरोना विषाणूमुळे दिवसेंदिवस वाढत जाणारे लॉकडाउन विचारात घेता, अनेक हातावर पोट असणार्‍या गरीब कुटुंबांचे रोजगार बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे, याची जाणीव लक्षात घेऊन

चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी स्वतःचे पगारातून जमा केलेल्या राकमेतून मागे गरीब कुटुंबाना मदत केली होती आता देखील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांच्या पगारातील जमा राकमेतून  2,25000 (दोन लाख पंचवीस हजार रुपये) व चाळीसगाव येथील गुजरात अंबुजा कंपनी यांचेकडील सहाय्य यातून चाळीसगाव शहरातील गरजू व गरीब 1111 कुटुंबाना किराणा मालाचे वाटप त्यांचे घरी जाऊन करण्यात येणार आहे.

यामध्ये गुजरात अंबुजा कंपनीकडून 4000 किलो तांदूळ व 1111 तेलाच्या बॅग असे किराणा साहित्य प्राप्त झाले  असून, चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या जमा रकमेतून 1111 गव्हाच्या पिठाच्या प्रत्येकी 5 किलोच्या बॅग, 1111 किलो डाळ, 1000 किलो तांदूळ असा किराणा माल विकत घेऊन तो प्रत्येक कुटुंबास प्रत्येकी 5 किलो गव्हाचे पीठ, 5 किलो तांदूळ, 1 किलो डाळ, 1 लिटर तेल असे किराणा मालाचे किट एकत्रितपणे शहरातील गरजू व गरीब कुटुंबांना घरपोच देण्यात येणार आहे.

या वाटपाचा कार्यक्रम आज सायंकाळी 5 वाजता कारगाव रोडवरील अल्पबचत भवन येथे पार पडला यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, डी वाय एस पी कैलास गावडे, पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड, अंबुजा कंपनीचे वैभव पाटील, ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर, आर डी चौधरी, संजय सोनार, देविदास पाटील, मुराद पटेल, सूर्यकांत कदम, स पो नि आशिष रोही, मयुर भामरे, पो उ नि महावीर जाधव, विजय साठे, डी बी चे बापूराव भोसले, गोपनीय शाखेचे गणेश पाटील, पंढरीनाथ पवार यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.