रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी भाजपा पाचोरा-भडगावतर्फे औषध वाटप

0

पाचोरा  प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टी पाचोरा -भडगाव यांच्या वतीने व बाजार समिती सभापती सतिष शिंदे यांच्या माध्यमातुन कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये येणार्‍या शेतकरी, व्यापारी, हमालमापाडी बांधव तसेच इतर सर्व नागरिकांना भा.ज.पा. तालुकाअध्यक्ष अमोल शिंदे  यांच्या हस्ते भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी शिफारस केलेले होमिओपॅथीक औषध आर्सेनिक अल्बम – 30 च्या वाटपाची सुरुवात करण्यात आली आहे. कोरोना (कोविड – 19) चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असुन जगातील सर्वच  देश संशोधनात लागले आहेत. परंतु आज पावतो कुठलेही ठोस असे निदान ह्या महाभयंकर आजारावर निघालेले नसून कोरोना ह्या आजाराशी लढण्यासाठी फक्त आपली रोग प्रतिकार शक्ती कशी वाढवता येईल ह्याबाबतीत आपण सर्वांनी काळजी घेतली पाहीजे. यावेळी अमोल शिंदेंनी सांगितले तसेच सद्यस्थितीत हे औषध उपलब्धतेनुसार पाचोरा व भडगाव शहरातील प्रतिबंधित क्षेत्रामधील 25 हजार नागरिकांना वाटप केले जाईल. ह्या उद्देशाने मागविले असून येणार्‍या काळात लवकरच पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागातील जवळपास एक लाख नागरिकांना होमिओपॅथीक औषध आर्सेनिक अल्बम -30 हे घरपोच वाटप करण्याचा मानस अमोल शिंदे यांनी व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.