अंतुर्ली येथील ज्ञानोदय वाचनालयात शिक्षक दिन साजरा

0

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील अंतुर्ली येथील ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालायतर्फे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुक्ताईनगर येथील तहसिलदार शाम वाडकर साहेब यांची उपस्थिती होती.

डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिवस शिक्षक दिन म्हणून सर्व भारतभर साजरा करण्यात येतो या दिवसाचे औचित्य साधून ज्ञानो दय वाचनालायतर्फे अंतुर्ली परिसरातील सर्व जिल्हा परिषद तसेच माध्यमिक व इंग्लिश मेडियम शाळांच्या मुख्याध्यापक व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. प्रसंगी सेवानिवृत्त शिक्षकांचाही गौरव करण्यात आला. याप्रसंगी  डॉ.राधाकृष्णन यांच्या जीवनावरील पुस्तकांचे ग्रंथप्रदर्शन भरविण्यात आले शिक्षक वर्गातून श्री.चौधरी सर तर विद्यार्थी वर्गातून योगेश पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष एस ए भोई सर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नीलकंठ महाजन, सरपंच विलास पांडे, पोलीस पाटील किशोर मेढे, दिनेश पाटील, भानुदास पाटील, मोहन बेलदार,भाऊराव महाजन, अनिल वाडिले, शरद महाजन, नामदेव भोई, सर्व वाचक, गावातील नागरिक  तसेच वाचनालयाचे कर्मचारी  उपस्तीत होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. डी. बारी सर यांनीतर आभार अनिल वाडिले केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी शांताराम महाजन, मधुकर वानखेडे, अनिल न्हावकर यांचे सहकार्य लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.