अंजली दमानिया विरोधात पकड वॉरंट

0

 

रावेर कोर्टाचे सांताक्रूझ पोलीसांना आदेश

जळगाव ;- माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर विविध आरोप करुन बदनामी करणाऱ्या मुंबईतस्थित समाजसेविका अंजली दमानिया यांच्या विरोधात रावेर न्यायालयाचे न्या. डी. जी. मालविय यांनी आज पकड वाॉरंट जारी केले. हे वॉरंट हस्ते पाकिटातून बजावण्यात येणार आहे. त्यामुळे अंजली दमानिया जेथे असतील तेथे त्यांना अटक होवू शकेल.

जावायाची लिमोझीन कार, भोसरी भूखंड प्रकरण, अपसंपदा गोळा करणे, कार्यकर्त्याचे लाच प्रकरण आदी विषयांवर बेछूट आरोप अंजली दमानिया यांनी जळगावात येवून केल्याबद्दल भाजपचे रावेर तालुकाध्यक्ष सुनील पाटील यांनी खडसेंची बदनामी केल्याचा खटला (क्रमांक 416) कलम (500 व 501) नुसार भरला आहे. या खटल्याचे रितसर समन्स प्राप्त होवून जवळ जवळ 2वेळा संधी दिली मागील तारखेला अंजली दमानीया यांच्या वकिलांनी आश्वासन दिले होते की आज दी 13/4/18 रोजी कोर्टात हजर ठेउ परंतु आज 5:30 वाजेपावेतौ वाट बघून आरोपी अंजली दमानीया व वकील दोन्ही गैरहजर होते व मुदत मिळणे चा अर्ज ही सादर केला नसल्याने पकड़ वारंट जारी करून हाती पाकीट चा अर्ज मंजूर ही केला या खटल्यात फिर्यादीतर्फे ॲड. चंद्रजित पाटील व ॲड. तुषार माळी काम पाहत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.