अंजनविहीरेचे मुख्याध्यापक एस.आर.पाटील यांचा सत्कार

0

भातखंडे (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेच्या अंजनविहीरे माध्यमिक विद्यालयाचे गोड व्यक्तिमत्व तथा मुख्याध्यापक  एस. आर.(तात्या)पाटील यांची प्रकृती अचानक खराब झाली होती.

यातून सुधारणा होण्याचे चिन्ह दिसत नव्हते पण आई वडिलांच्या ,आप्तेष्ट नातेवाईकांच्या, मित्र परिवाराच्या व हितचिंतकांच्या आशीर्वादाने व सहकार्याने उपचार घेऊन सुखरूप सुदृढ होऊन घरी परतले व शाळेत हजर होऊन आपल्या काम – काजाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळण्यास समर्थ झाले.

त्या निमित्ताने आपल्या विद्यालयाचे स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन नानाजी सिताराम पाटील यांनी विद्यालयात सहह्रदय सत्कार करून आरोग्यासाठी ईश्वर चरणी प्रार्थना केली व पुढील निरामय व आनंददायी आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांनी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान केला प्रसंगी शाळेचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.