अँग्लो उर्दू कॉलेज धरणगाव येथे त्रिवेणी समारंभ

0
धरणगांव:- येथील धरणगाव उर्दू एज्युकेशन सोसायटी ने सुवर्ण  महोत्सवी वर्षात पदार्पण केल्याच्या निमित्ताने अँग्लो उर्दू प्राथमिक, हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे  त्रिवेणी समारंभ उत्साहाने संपन्न झाले. या त्रिवेणी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. प्रा.दादासाहेब श्री.डी.आर पाटील सर ( manegment council member).(K B. C. N. M. U. Jalgaon ) यांनी भूषविले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक शेख शकीलुद्दीन जमीलोद्दीन सर यांनी मांडले.
संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाची सुरूवात अनेक मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. या कार्यक्रमात राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा मा. ना.श्री गुलाबरावजी पाटील साहेब ,धरणगावचे नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष मा. श्री. निलेश चौधरी तसेच लिटिल ब्लॉझम शाळेची उपशिक्षिका बतुल बी युसूफ भाई साकी आदर्श शिक्षक पुरस्कार निमित्त यांचे संस्थेतर्फे व शाळेतर्फे सत्कार करण्यात आले. या प्रसंगी शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरणही करण्यात आले.
याच त्रिवेणी समारंभात मरहूम सलीमभाई पटेल उत्तुंग व्यक्तिमत्व व कुशल प्रशासक या विषयावर मा. श्री. डी. जी. पाटील साहेब (प्रदेश सचिव काँग्रेस )मा. श्री. गुलाबराव वाघ साहेब (शिवसेना जिल्हा प्रमुख )मा. प्रा. श्री. बी. एन. चौधरी सर मुख्या. प.रा वि )या वक्तव्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी पदार्पणाच्या निमित्ताने संस्थेचे संस्थापक सेक्रेटरी अब्दुल रहीम खान व संस्थापक सदस्य तथा शालेय समिती चेअरमन हाजी एहसान हुसेन साकी  साहेब यांचेही मान्यवरांनी अभिनंदन व सत्कार केले.
या त्रिवेणी कार्यक्रमासाठी प्रमुख म्हणून मा.हाजी अब्दुल गफ्फार मलिक साहेब, मा. डाॅ. अब्दुल करीम सालार साहेब अॅड. अकील इस्माईल, श्री. दीपक वाघमारे, मा. मुश्ताक सेठ बोहरी, श्री. सी. के. पाटील सर, सर्व सन्माननीय नगरसेवक धरणगाव, जहीरोद्दीन सेठ, जाकिर सैय्यद, गावतील प्रतिष्ठित नागरिक, पालक तसेच  संस्थेचे अध्यक्ष- हाजी शफी अहमद  भाईमियाँ काझी ,सेक्रेटरी -अब्दुल रहीम खान युसूफ खान, चेअरमन  – हाजी एहसान हुसेन सुलतान अली साकी , व कार्यकारी सभासद एजाज अहमद खान अब्दुल रहीम खान , अकील अहमद अब्दुल रज्जाक काझी,अलीम अहमद हाजी अब्दुल्लाह शिरपूरकर,युसुफ भाई हाजी एहसान हुसेन साकी  गुलाम ख्वाँजा हाजी मो. इस्हाक मोमीन ,अकबर खान करीम खान ,मोहम्मद साबिर मोहम्मद सादिक , मोहम्मद उमर मोहम्मद हातम तौसिफ सलीम पटेल तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी  वर्ग, विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पठान वसीम सर व मोहसीन शाह सर यांनी तर आभार प्रदर्शन अकील खान सर यांनी केले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली .

Leave A Reply

Your email address will not be published.