सीडीएस परीक्षेत अमळनेरचा तुषार पाटील देशात ७२ वा

0

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

भारत सरकारने यूपीएससी मार्फत घेतलेल्या सीडीएस (combined Defence services Examination 2021) परीक्षेचा निकाल दि.२४ डिसेंबर रोजी जाहीर झाला असून या परीक्षेत अमळनेर तालुक्यातील रंजाणे येथील तुषार मच्छिंद्र पाटील याने दैदीप्यमान यश संपादन केले आहे.

इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये देशात ७२वा तर भारतीय नौदलात ४२ वा क्रमांक पटकाविला आहे. त्यामुळे तुषार याला भारतीय सैन्यदलात थेट लेफ्टनंटपदी विराजमान होऊन देश सेवे करिता उच्च पदावर कर्तव्य बजावण्याची संधी प्राप्त झाली आहे. तुषारने पहिल्याच प्रयत्नात वयाच्या एकविसाव्या वर्षी सदरचे यश प्राप्त केले असून त्यामुळे सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे व अमळनेरचे नाव देशात उंचावलेले आहे.

तुषारचे वडील मच्छिंद्र दोधू पाटील हे देखील सीआरपीएफ दलात सब इन्स्पेक्टर म्हणून जम्मू कश्मीर येथे देशसेवा बजावीत आहेत. तुषार हा माजी जि.प.सदस्य अॅड.व्ही. आर. पाटील यांचा नातू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here