महाराष्ट्रात कोरोनाचा तिसरा बळी ; कोरोनाग्रस्तांची संख्या ८९ वर

0

मुंबई : राज्यात कोरोना ग्रस्तांच्या संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यात आज राज्यात कोरोनाने तिसरा बळी घेतला आहे. मुंबईतील खासगी रूग्णालयात या कोरोना बाधिताचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. मृत व्यक्ती 59 वर्षीय असून फिलिपिन्स येथून आला होता असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाने एकूण तीन जणांचे बळी घेतले आहेत.

महाराष्ट्रातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येतही 15 ने भर पडली आहे. राज्यात आणखी 15 रूग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी मुंबईतील 14 तर पुण्यातील एक आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 89 वर पोहोचला आहे. महाराष्ट्रासाठी आणि मुबंईसाठी ही चिंतेची बाब आहे.

राज्यातील वाढता प्रादुर्भाव पाहता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जनतेला नियमांचे  पालन करण्याचे आवाहन केले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, ‘नव्या कोरोना बाधितांची जी संख्या समोर आली आहे. ती ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या संसर्गातून झाली आहे. आपल्या सर्वांनाच काळजी घेण्याची गरज आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.