नागपुरात अल्पवयीन मुलीवर 4 कंडक्टरनी केला बलात्कार

0

नागपूरच्या मानकापूर परिसरात घटना  ; प्रकरणातील चारही आरोपींना पोलिसांनी ताब्यात
नागपुर | प्रतिनिधी
नागपूरमध्ये बलात्काराचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 4 स्टार बस कंडक्टरने एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा प्रकार नागपूरच्या मानकापूर परिसरात घडला आहे. या प्रकरणातील चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
नागपुरातील १६ वर्षीय पीडीत एका शाळेतील विद्यार्थिनी आहे. पीडीत विद्यार्थिनी बसमधून रोज शाळेत ये-जा करायची. याच काळात तिची आशिष या आरोपीशी ओळख झाली. आशिषने सुरुवातीला तिच्याशी मैत्री केली आणि नंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केला.
सगळ्यात धक्कादायक म्हणजे ही बाब त्याने त्याच्या सहकाऱ्यांना सांगितलं. त्यानंतर इतर तिघांनी तिच्यावर वारंवार बलात्कार केले. बदनामीच्या भितीनं पीडित मुलगी गप्पा होती. नंतर आरोपींच्या आत्याचाराला कंटाळून पीडितेनी ही बाब आई-वडीलांना सांगितली. पीडितेच्या तक्रारीनंतर मानकापूर पोलिसांनी सामुहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करत या चारही आरोपींना ताब्यात घेतलं आहे.
यात उमेश मेश्राम, धर्मपाल मेश्राम, आशिष लोखंडे आणि शैलेश वंजारी अशी आरोपींची नावं आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.