जळगाव : जिल्हा रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांना आजपासून राष्ट्रवादीतर्फे ‘खिचडी वाटप’चे आयोजन

0

जळगाव : कोरोना व्हायरसच्या थैमानामुळे सध्या देशासह राज्यात सरकारतर्फे महाराष्ट्र लॉकडाऊन करण्यात आल्याने फक्त अत्यावश्यक सेवा उपलब्ध आहेत. त्यामुळे इतर सेवा जनतेला पुढील 31 तारखेपर्यंत बाकी सेवा बंद राहतील. यामुळे जळगाव शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये असणाऱ्या रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना असंख्य अडचणी येत आहेत. अगदी जेवणापासून ते इतर समस्यांना नागरिकांना अडचणी येत आहेत. म्हणून जळगावातील जिल्हा रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांना आज संध्याकाळपासून राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव महानगरतर्फे ‘खिचडी वाटप’ करण्यात येणार आहे. याबाबतचे आयोजन राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील यांनी केलं आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून हा अभिनव उपक्रम राबवणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.