कागदी गणेशमुर्तींना प्रतिबंधासह विविध मागण्यांसाठी

0

हिंदूत्ववादी संघटनांचे मनपावर आंदोलन

जळगाव- कागदी लगद्याच्या गणेशमुर्तींना प्रतिबंध आणावा, काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करावे यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलन संघटनेच्या वतीने दि. 17 रोजी सकाळी 10.30 वा. महानगरपालिकेजवळ आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा राष्ट्रीय हिंदू आंदोलन संघटनेतर्फे देण्यात आला आहे.

कलम 370रद्दचे समर्थन असून काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन व्हावे, आंध्रप्रदेशात इमाम व पास्टर यांना मिळणारे मानधन रद्द करा, उत्तर प्रदेशातील चर्चचा 1 कोटींचा घोटाळा उघड झाला आहे. म्हणून चर्चचे सरकारीकरण करावे. जय श्रीराम म्हटले नाही म्हणून मारले असा खोटा प्रचार करुन हिंदूंना बदनाम करणाऱ्यांवर कठोर कारवार्इ करा आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.