कजगाव येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या

0

भडगाव (प्रतिनिधी)  : तालुक्यातील वाडे येथील ५२ वर्षीय व्यक्तीने कजगाव येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. ही घटना दि. २१ रोजी सकाळी ८ वाजेपुर्वी कजगाव गोंडगाव रोडवरील नवीन लाॅन्समध्ये घङली.

याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला अरविंद फकीरा पाटील पोलीस पाटील रा. वाडे ता. भडगाव यांनी दिलेल्या खबरीवरुन अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी कि, निंबा रामदास पाटील वय ५२ वर्ष रा. वाङे ता. भडगाव या ईसमाने कजगाव गोंडगाव रोडवरील नवीन लाॅन्सच्या किचन रुमच्या बांधकाम सुरु असलेल्या पञी शेडच्या लोखंडी अॅंगलला दोरी बांधुन फळफास घेतल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला. याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार छबुलाल नागरे हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.