संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालयात एक दिवसीय ऑनलाइन कार्यशाळा संपन्न

0

मुक्ताईनगर (प्रतिनिधी):-  संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालयात ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल अंतर्गत ऑनलाइन जॉब ट्रेनिंग वर्कशॉप ही कार्यशाळा पार पडली.

या कार्यशाळेत  TATA STRIVE LED MOBILIZATION DEPARTMENT पुणे या विभागाचे समन्वयक श्री. सुबोध जाधव सर यांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले. विविध प्रकारचे ऑनलाईन प्रशिक्षण, नोंदणी, शिक्षण कसे घ्यायचे दहावी, बारावी व पदवीनंतर काय केले पाहिजे याबाबत सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली या कार्यशाळेत अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आय.डी .पाटील सरांनी मनोगत व्यक्त करून ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांना कशी प्राप्त होतील आणि ग्रामीण भाग हा भारताचा विकासाचा खूप मोठा भाग आहे, त्याला दिशा व चालना देण्यासाठी अशा कार्यशाळा उपयुक्त ठरतील असे मत मांडले त्याच बरोबर TATA STRIV LED MOBIZALATION पुणे या कंपनीशी विद्यार्थी हितासाठी आपण करार करू असे प्राचार्यांनी सांगितले. या कार्यशाळेत शैक्षणिक समन्वयक प्रा. एल.बी गायकवाड व महाविद्यालयातील 90 पेक्षा जास्त विद्यार्थी आणि प्राध्यापक सहभागी होते. या ऑनलाईन कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा.ए.जी. कुलकर्णी तर आभार प्रदर्शन डॉ.पी.एस. देशमुख यांनी केले. अशाप्रकारे महाविद्यालयात एक दिवसीय ऑनलाइन जॉब ट्रेनिंग कार्यशाळा सर्वांच्या सहकार्याने यशस्वी पार पडली.

Leave A Reply

Your email address will not be published.