पत्नीचा जाच इतका असह्य की ‘पतीची आत्महत्या’

आत्महत्येपूर्वी लिहिली चार पानी चिठ्ठी : पत्नी लग्नानंतर दोन महिन्यातच माहेरी

0

 

नाशिक | लोकशाही न्यूज नेटवर्क

नाशिकमध्ये एका वेगळीच घटना उघडकीस आली आहे. चक्क पत्नीच्या त्रासातून पतीने आत्महत्या केल्याची घटना नाशिकच्या आडगाव परिसरात घडली. पत्नीसह सासू आणि सासरच्या मंडळीच्या त्रासाला कंटाळून पतीने हे टोकाचे पाऊल उचलले. दरम्यान आत्महत्या केलेल्या मुलाच्या वडिलांनी पोलिसांत धाव घेतली. यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. या प्रकाराने नाशिक परिसरात एकच खळबळ उडाली.

 

तुषार अंतारपूरकर असे आत्महत्या केलेल्या मृताचे नाव असून तुषारने आत्महत्येपूर्वी चार पानी चिठ्ठी लिहिली होती. या चिठ्ठीत त्याने “मी पत्नी आणि सासरच्या लोकांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत आहे.” असे म्हटलं आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या कलमांतर्गत वडिलांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवला आहे.

 

नेमके प्रकरण काय?

तुषारचा २००८ साली शीतलसोबत विवाह झाला होता. मात्र पत्नी लग्नानंतर दोनच महिन्यातच माहेरी निघून गेली होती. गेल्या १५ वर्षांपासून ती तिच्या आई-वडिलांच्या घरी आहे. नवरा मुलगा तुषार हा तिला घरी येण्यासाठी वारंवार विनंती करत होता. मात्र शीतल सासरी परत गेली नाही. सासरे वसंत चव्हाण, सासू शालक यांनी संगनमत करत तुषारचा शारीरिक, मानसिक छळ करत होते. तुषार या छळाला कंटाळला होता. आता आत्महत्या करण्याशिवाय काहीच पर्याय नसल्याचे त्याने आत्महत्येपूर्वी चिठ्ठीत लिहिले आहे. त्यानंतर मंगळवारी दुपारी आत्महत्या केल्याचे वडील केशव अंतापूरकर यांनी पोलिसांना सांगितले. 

Leave A Reply

Your email address will not be published.