व्हाट्सअप आणणार अपडेटेड व्हर्जन; वाचा सविस्तर

0

दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

व्हाट्सअप मुले आपले जवान अगदी सोयीस्कर झाला आहे. व्हाट्सअप हे नेहमीच आपल्या युजर्ससाठी नेहमी काही ना काही नवीन अपडेट्स आणत असते. तर आता पुन्हा एक नवीन बदल व्हाट्सअप लवकरच करेल असं समजत आहे. इन्स्टंट मॅसेजिंग एप व्हॉट्सअप आपल्या युजरला चांगली सेवा देण्यासाठी या सेवेत अनेक नवनवीन फिचरचा समावेश करीत असते.त्याच एक नविन फिचर समाविष्ठ होणार आहे.व्हाट्सअप मॅसेजिंग आणि व्हॉईस कॉलिंगचा अनुभव अधिक सुविधाजनक बनविण्यासाठी नविन फिचर आणण्याची तयारी केली आहे. व्हॉट्सअप मॅसेजिंग मध्ये मोठा बदल करणार आहे. आपण कुणाला चुकून पाठविलेला मॅसेज ठराविक काळापर्यंत डिलिट करीत असतो. परंतू आता कंपनी याच्याहीपुढे जात आणखीन नविन निर्णय आणला आहे.

व्हॉट्सअप एका नविन फिचरवर काम करीत आहे. आतापर्यंत आपण कुणाला चुकीचा संदेश पाठवलेला असेल तर त्या मॅसेजला ठराविक वेळात डिलिट फॉर एव्हरीवन असे करीत होतो. आता आपण सेंड केलेल्या मॅसेजलाही एडीट करू शकणार आहोत, हे फिचर के्व्हा येणार ते अजून कळलेले नाही. या नव्या फिचरवर टेस्टींग चालू आहे. लवकरच ते युजरसाठी उपलब्ध होणार आहे. अनेक युजरची मागणी होती अशा प्रकारे पाठवलेल्या संदेशांनाही एडीट करण्याची सोय असावी.

Leave A Reply

Your email address will not be published.