लक्ष द्या ! ‘या’ 35 स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सॲप चालणार नाही

यात तुमचा फोन तर नाहीये ना? पहा लिस्ट

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क 

स्मार्टफोन आता काळाची गरज झालीय. त्यातच व्हॉट्सॲप शिवाय तर जगणे देखील कठीण झालेय. तुम्हीही व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी नक्की वाचा. नाही तर आता तुमच्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सॲप चालणार नाही.

आता व्हॉट्सअपने आपल्या सिस्टममध्ये काही बदल केले आहेत आणि त्यानुसार काही अँड्रॉईड फोन, आयफोनमध्ये व्हॉट्सअप चालणार नाहीये. मेटाच्या प्रसिद्ध मेसेजिंग अॅप असलेल्या व्हॉट्सअप संदर्भात महत्त्वाचे अपडेट आले आहे. व्हॉट्सअपने आपल्या नवीन सिस्टममध्ये काही बदल केले आहेत. ज्यामुळे जुन्या अँड्रॉईड फोनमध्ये आणि आयफोनमध्ये व्हॉट्सअप चालणार नाहीये. ज्यामुळे जुने फोन्स असलेल्या युजर्सला समस्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फोन्सच्या यादीत सॅमसंग, मोटोरोला, हुवैई, सोनी, एलजी आणि अॅप्पल यासारख्या ब्रँडच्या एकूण 35 मोबाईल्सचा समावेश असणार आहे.

काय आहे उद्देश?

व्हॉट्सअपने घेतलेल्या या निर्णयामागे नेमका उद्देश असा आहे की, व्हॉट्सअपची सुरक्षा वाढवणे. मात्र, व्हॉट्सअप अपडेट केल्यावर काही युजर्स आपल्या फोनमध्ये हे अॅप वापरु शकणार नाहीयेत. त्यामुळे अशा युजर्सला व्हॉट्सअप वापरण्यासाठी नवा स्मार्टफोन घ्यावा लागणार आहे.

या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप चालणार नाही

सॅमसंग गॅलक्सी एस प्लस (Samsung Galaxy Ace Plus)

सॅमसंग गॅलक्सी कोर (Samsung Galaxy Core)

सॅमसंग गॅलक्सी एक्सप्रेस 2 (Samsung Galaxy Express 2)

सॅमसंग गॅलक्सी ग्रँड (Samsung Galaxy Grand)

सॅमसंग गॅलक्सी नोट 3 (Samsung Galaxy Note 3)

सॅमसंग गॅलक्सी एस 3 मिनी (Samsung Galaxy S3 Mini)

सॅमसंग गॅलक्सी एस 4 अॅक्टिव्ह (Samsung Galaxy

सॅमसंग गॅलक्सी एस 4 मिनी (Samsung Galaxy S4 Mini)

सॅमसंग गॅलक्सी एस 4 झूम (Samsung Galaxy S4 Zoom)

मोटो जी (Moto G)

मोटो एक्स (Moto X)

Huawei Ascend P6

Huawei Ascend G525

Huawei C199

Huawei GX1s

Huawei Y625

Sony Xperia Z1

Sony Xperia E3

LG Optimus 4X HD

LG Optimus G

LG Optimus G Pro

LG Optimus L7

iPhone 5

iPhone 6

iPhone 6S

iPhone 6S Plus

iPhone SE first-gen

Leave A Reply

Your email address will not be published.