राज्यात हायअलर्ट ! ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पावसाने राज्याच्या अनेक भागात हजेरी लावली आहे. हा पाऊस मान्सूनचा नसून पूर्व मॉन्सून असल्याचा हवामान खात्याचा दावा असून राज्यात हायअलर्ट देण्यात आला आहे.  आज राज्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडटांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्रासह दक्षिण कोकणात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर आज जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छ. संभाजीनगर, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, धुळे, नंदुरबार आणि जळगावमध्येही हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) प्रवेशद्वारावर महाराष्ट्राच्या असलेल्या गोव्यात दाखल झाले असतानाच महाराष्ट्रावर बुधवारी (ता. ५) वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी पडतील, असा अंदाज हवामान खात्याने मंगळवारी व्यक्त केला. त्यासाठी व महाराष्ट्राला हवामान खात्याने ‘येलो अलर्ट’ दिला आहे. तसेच मुंबई, मुंबई उपनगर, पालघर,जळगाव, धुळे आणि नंदूरबार हे जिल्हे वगळता संपूर्ण राज्यात हवामान खात्याने वादळी वाऱ्याचा इशारा दिला आहे.

 

याठिकाणी वादळी पावसासह येलो अलर्ट

कोकण : ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग

मध्य महाराष्ट्र : नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.

मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, बुलडाणा, परभणी, हिंगोली.

विदर्भ : बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.