एल.एच.पाटील इंग्लिश मीडियम स्कूल वावडदा येथे नवरात्रीचा जल्लोष

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

वावडदा चैथील एस एच पाटील इंग्लिश मीडियम स्कूल येथे नवरात्री उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. नवरात्री उत्सवासाठी संस्थेचे जितेंद्र पाटील उपाध्यक्ष वीरेंद्र पाटील, वैशाली यांची उपस्थिती होती. उत्सवाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते श्री दुर्गाप्रतिमेचे पूजन व श्री दुर्गेची आरती करण्यात आली. या उत्सवात विद्यार्थ्यांसाठी दांडिया, रास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेसाठी प्रत्येक वर्गातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपला सहभाग नोंदवला होता. उत्साहात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा देखील परिधान केली होती.

याप्रसंगी नवरात्री उत्सवाचे महत्व योगेश चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. मुख्याध्यापिका जयश्री पाटील यांनी श्री शक्तीचा जागर या विषयी आपले मनोगत सादर केले. या उत्सवात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थी स्पर्धामधून प्रत्येक उत्कृष्ट वेशभूषा व उत्कृष्ट दांडिया असे दोन पारितोषिक देण्यात आले. उत्सवाच्या शेवटी शिक्षक दिपक सराफ यांनी आभार प्रदर्शन केले. उत्सवाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.