वंचितची साथ सोडून वसंत मोरे शिवबंधनात

0

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क 

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नेते वसंत मोरेंनी मुंबईत शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मातोश्रीवर जाऊन त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन राजकीय भवितव्याबद्दल चर्चा केली. ते लवकरच ठाकरे सेनेत प्रवेश करणार आहेत. त्यासाठीचा मुहूर्त देखील निश्चित झाला आहे. वसंत मोरेंनी ठाकरेंची भेट घेतली, त्यावेळी तिथे राज्यसभेचे खासदार संजय राऊत, माजी खासदार विनायक राऊत आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. मनसेला जय महाराष्ट्र करत वंचितकडून लोकसभा निवडणूक लढवलेल्या वसंत मोरेंना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांना अवघी 32 हजार 12 मते मिळाली. त्यांच्यामुळे पुणे लोकसभेत तिरंगी लढत होईल असे वाटत होते.

मोरेंमुळे काँग्रेसच्या रविंद्र धंगेकरांना फटका बसेल अशी शक्यता वर्तवली जात होती. पण प्रत्यक्षात तसे काहीच घडले नाही. भाजपचे मुरलीधर मोहोळ एक लाखापेक्षा जास्त मतांनी विजयी झाले. लोकसभा निवडणूक निकालाला महिना उलटलेला असताना आता वसंत मोरेंनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली.

Leave A Reply

Your email address will not be published.