वरणगाव आयुध निर्माणी वसाहतीत विजेच्या खांबावरून पडल्याने कामगाराचा मृत्यू…

0

 

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

आयुध निर्माणीच्या वसाहतीत विजेच्या खांबावर चढून काम करणाऱ्या कामगाराचा विजेचा धक्का बसल्यावर खाली पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची झाल्याची घटना आज सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडली आहे.
या बाबत सविस्तर वृत असे की, आयुध निर्माणीच्या वसहत मधील विद्युत दुरुस्ती देखभालीचे काम भुसावळ येथील भिरूड इलेक्ट्रीक या खासगी ठेकेदारामार्फत होते. दि २८ मे मंगळवार रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास विज कामगार सुनिल अशोक सपकाळे (रा. शिंदी सुरवाडा ) हा 5 टाईप परिसरातील भागात विजेच्या खांबावर चढून काम करीत असताना त्याला अचानक विजेचा जोरात धक्का बसला. त्यात सुनिल हा जमीनीवर खाली कोसळला, त्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
सुरक्षा साहित्याविना करीत आहे कामगार काम
जोखमीचे काम करीत असताना वास्तवीक ठेकेदाराकडून सुरक्षेसाठी कामगारांना साहीत्य पुरवणे आवश्यक असते. मात्र आयुध निर्माणीच्या वसाहत मध्ये कामगार हे सुरक्षा साहित्या विनाच काम करीत होते. जर डोक्यात हेलमेट व हॅन्डग्लोज असते तर कदाचीत सुनिल याचे प्राण वाचले असते, असे बोलले जात आहे. मयत सुनिल सपकाळे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.
यावेळी निर्माणी महा प्रबंधक ओझा यांनी रुग्णालयात भेट देत मयताच्या नातेवाईकांचे सात्वन करून कारवाईचे अश्वासन दिले.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच उप सह निरिक्षक गणेश देशमुख, पो.ना.कॉ अजय निकम, प्रशांत ठाकुर, राहुल येवले, प्रविण पाटील, योगेश पाटील, यांनी घटना स्थाळी धाव घेत नातेवाईकना शांत करण्याचे प्रयत्न केले. याबाबत डॉक्टर यांच्या खबरी वरून वरणगाव पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे. सुनिल सपकाळे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन वरणगाव ग्रामीण रूग्णालयात करून नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला. घटनेचा पुढील तपास पो.हे.कॉ नावेद अली हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.