उत्राण प्राणघातक हल्ला: दोन्ही आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर

0

 

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

गाडीला कट लागल्याच्या वादातून ६ जून २०२४ रोजी, रात्री १०.३० वाजेच्या सुमारास उत्राण येथील फेमस हॉटेलला प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली होती.

निलेश भिला कोळी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचे प्रकरणी भिकन कोळी, मयूर वाघ, भागवत पाटील, गणेश कोळी, आकाश कोळी, दत्तू कोळी, प्रशांत कोळी, अण्णा कोळी अशा एकूण ८ आरोपींविरुद्ध भा. द. वि. कलम ३०७, १४३, १४४, १४७, १४८, १४९ तसेच शस्त्र अधिनियम ४, २५ प्रमाणे कासोदा पोलीस स्टेशनला गू. र. क्रमांक ९९/२०२४ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.

सदर घटनेतील आठही आरोपी प्राणघातक जीवघेणा हल्ला केल्याच्या दिवसापासून फरार असून, आठ आरोपींपैकी भिकन रमेश कोळी आरोपी क्रमांक ३ व मयूर भरत वाघ आरोपी क्रमांक ७ या दोन आरोपींनी जिल्हा व सत्र न्यायालय, जळगाव येथे अटकपूर्व जामीन अर्ज क्रमांक ८००/२०२४ दाखल केला. तदनंतर सदर अटकपूर्व जामीन अर्जास फिर्यादी निलेश भिला कोळी व जखमी साक्षीदार मंगेश नामदेव पाटील यांनी आरोपींच्या अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर होणेस हरकत घेतली.

मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश जळगाव यांनी २६ जुन रोजी जामीन अर्जा वर सुनावणी घेत सरकारी पक्षाची तसेच मूळ फिर्यादी निलेश भिला कोळी व जखमी साक्षीदार मंगेश उर्फ भोला नामदेव पाटील याची व आरोपी पक्षाची बाजू ऐकून घेत, अखेर भिकन रमेश कोळी व मयूर भरत वाघ या आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज २७ जुन रोजी नामंजूर केला. मूळ फिर्यादीतर्फे व जखमी साक्षीदारा तर्फे ॲड. अजिंक्य काळे व ॲड. आकाश महाजन यांनी कामकाज पाहिले. ॲड. कल्पेश पाटील यांनी सहकार्य केले .

Leave A Reply

Your email address will not be published.