वृद्धाला टार्गेट करत भरदिवसा दोन लाख लांबवले

0

 

पाचोरा

 

शहरात सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे बँकेतून काढलेले दोन लाख भर दिवसा लांबविल्याची घटना घडली. सुपडू भादू विद्यालयाच्या परिसरात असलेल्या एका बँकेतून वयोवृद्ध सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने काढलेले २ लाख रुपये काढले होते. दरम्यान अज्ञात भामट्यांनी सापळा रचून पैसे लांबविले. सदर घटना गुरूवारी दुपारी १२ वाजता घडली असून याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

मिळालेली माहिती अशी की, सुभाष पाटील (वय ७१) हे पाचोरा येथे तलाठी कॉलनीत आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. त्यांनी  गुरूवारी ४ जुलै रोजी दुपारी १२ वाजता पाचोरा शहरांतील एचडीएफसी बँकेतून २ लाख रुपये काढले होते. पैसे काढून दुपारी बँकेबाहेर आले असता जाण्यासाठी दुचाकीला चावी लावीत असतांना एका इसमाने त्यांचे जवळ येऊन चावीस झटका मारला. सुभाष पाटील हे खाली पडलेली चावी शोधत असतानाच त्यांची पैशाची बॅग लांबवली. दरम्यान चोरट्याचा दुसरा साथीदार शाळेसमोरच्या रस्त्याने समोरून समोर दुचाकी घेऊन आला. त्या भरधाव दुचाकीवर सदर चोरटा बसून दोघेही चोरटे क्षणातच पसार झाले. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.