ट्रिपल सीट जाण्यास अडवल्याचा राग, आर्मी जवानाने पोलिसांच्या डोक्यात घातला सिमेंट ब्लॉक

0

पुणे,लोकशाही न्यूज नेटवर्क

नियमन करत असताना दीड महिन्यांपूर्वी पोलीस आणि आर्मी जवानांची बाचाबाची झाली होती. त्याचा राग मनात ठेऊन काल रात्री २५ ऑक्टोबर रोजी आर्मी जवानाने पोलिसांच्या डोक्यात सिमेंटब्लॉक घातल्याची घटना घडली. यात पॉलिस कर्मचारी गंभीर जखमी झाला असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराजवळ घडली. रमेश धावे असं पोलीस कर्मचाऱ्यांच नाव आहे. तर वैभव संभाजी मन्हते असं आर्मी जवानाच नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

नेमकं काय घडलं?
दीड महिन्यांपूर्वी वाहतुकीचे नियमन करत असतांना पोलीस अंमलदार यांनी ट्रिपल सीट जाणाऱ्यांवर दंडात्मककारवाई केल्याची बाचाबाची झाली होती. कारवाई केल्याचा राग मनात धरून पोलीस अंमलदाराच्या डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केले. ढावरे यांनी दीड महिन्यांपूर्वी आरोपीवर दंडाची कारवाई केली होती. ट्रिपल सीट गाडी चालवल्यावर ही कारवाई करण्यात आली होती. आरोपी वैभव मनगटे याने राग मनात धरुन बदला घेण्याच्या उद्देशाने रमेश ढावरे यांचा शोध घेतला. बुधवारी संध्याकाळी सातच्या सुमारास ढावरे हे बुधवार चौकात वाहतुकीचे नियमन करत होते. त्यावेळी आरोपी त्याठिकाणी आला. त्याने ढावरे यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने सिमेंटचा ब्लॉक ढावरे यांच्या डोक्यात जोरात मारला. यामध्ये ढावरे हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.