चक्क ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली मात्र दैव बलवत्तर

वृद्धा थोडक्यात वाचली : पहूर येथे वाहतुकीची कोंडी

0

 

पहूर | लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

पहूर येथे पाण्याच्या टाक्या वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल्याने अपघात झाला. यात दैव बलवत्तर म्हणून वृद्धा थोडक्यात वाचली. ही घटना काल गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. यामुळे परिसरात खळबळ माजली होती. पहूर बस स्थानक परिसरात वाहतुकीची नेहमीच कोंडी होत असते. बेशिस्तपणे लावलेली वाहने आणि राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम यामुळे हा परिसर अपघात प्रवण क्षेत्र बनलेला आहे.

काल ट्रॅक्टरद्वारे पाण्याच्या टाक्या नेल्या जात होत्या. यावेळी ट्रॅक्टरची ट्रॉली वळणावर टर्न घेत असताना अकस्मातरीत्या उलटली. यावेळी तेथून जाणाऱ्या नर्मदाबाई भागवत घोंगडे या भाजीपाला विक्री करणाऱ्या वृद्धा बालबाल बचावल्या. ट्रॉली उलटल्याने टाक्यांमधील पाणी आजूबाजूच्या दुकानांमध्ये शिरले.

अपघात होताच बस स्थानक परिसरात तील लोक धावून आले. त्यांनी ट्रॉली पूर्ववत करण्यासाठी सहकार्य केले. महामार्गावर पार्क केली जाणारी वाहने इतरत्र हलविण्यात यावी अशी मागणी यावेळी स्थानिक व्यवसायिकांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.