अयोध्यावासियांवर ‘लक्ष्मण’ भडकले !

भाजपच्या पराभवानंतर संतापला ‘रामायण’ फेम अभिनेता

0

अयोध्या, लोकशाही न्यूज नेटवर्क 

लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल समोर आल्यानंतर सगळ्यांनाच आश्चर्य झाले. त्यात रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेत लक्ष्मणची भूमिका साकारत घरा-घरात पोहोचलेल्या अभिनेता सुनील लहरी यांनी निकाल पाहत नाराजी व्यक्त केली आहे. सुनील यांना सगळ्यात मोठा धक्का हा यूपीच्या फैजाबाद (अयोध्या) मतदार संघाच्या निकालानं पाहून बसला आहे. सुनील लहरी यांनी अयोध्येच्या रहिवाशांवर संताप व्यक्त केला आहे.

सुनील यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी म्हटले आहे की ‘आम्ही ही विसरलोच हे तेच अयोध्येचे रहिवासी आहेत ज्यांनी वनवासावरून परतलेल्या देवी सीतेवर संशय घेतला होता. देव जरी समोर आले ना तरी त्यांना देखील नकार देतील इतके स्वार्थी हिंदू आहेत. पुढे सुनील म्हणाले की ‘अयोध्येतील नागरिकांनी आपल्या खऱ्या राजाचा नेहमीच विश्वासघात केला याचा पुरावा इतिहासातही आहे.’ सुनील हे इथेच थांबले नाही तर त्यांनी पुढे देखील एक पोस्ट शेअर केली की ‘अयोध्येतील रहिवाशी तुमच्या महानतेसाठी सलाम आहे. तुम्ही तर माता सीताला सोडले नाही तर रामाला टेंटमधून बाहेर आणून भव्य मंदिरात स्थापना करणाऱ्यांना धोका देणे कोणती मोठी गोष्ट आहे. तुम्हाला कोटी कोटी नमस्कार. संपूर्ण भारत तुम्हाला आदराने पाहणार नाही. फैजाबादच्या मतदार संघाविषयी बोलायचे झाले तर सपाचे अवधेश प्रसाद यांनी भाजपा उमेदवार लल्लू सिंह यांचा 54567 मतांनी पराभव केला आहे.

दरम्यान, सुनील लहरी यांचे ‘रामायण’ या मालिकेतील सह-कलाकार अरुण गोविल यांनी उत्तर प्रदेशच्या मेरठच्या मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढली इतकंच नाही तर ते विजयी देखील ठरले. सुनील लहरी यांनी अरुण गोविल यांना शुभेच्छा देत एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ते म्हणाले की ‘मला आनंद आहे की दोन लोक, जे मला खरंच आवडतात. सगळ्यात आधी कंगना रणौत. ती महिला सशक्तिकरणाची प्रतीक आहे आणि तिने (हिमाचल प्रदेश) मंडी मधून विजय मिळवला आहे. दुसरी व्यक्त माझे मोठे भाऊ अरुण गोविल त्यांनी मेरठमधून विजय मिळवला आहे. दोघांना खूप खूप शुभेच्छा.

 

Leave A Reply

Your email address will not be published.