असह्य दीर्घ आजारातून तरुणाची गळफास घेत आत्महत्या

0

 

जळगाव | लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

एका तरुणाने पोटाच्या दीर्घ आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. यावल तालुक्यात असलेल्या साकळी गावात राहणाऱ्या एका विवाहीत तरूणाने असह्य पोटाच्या आजाराला कंटाळुन आपल्या राहत्या घरात गळफास घेतला. याबाबत यावल पोलिसांना अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुकेश माधव गजरे वय -४० वर्ष रा. साकळी ता. यावल असे या विवाहित तरूणाचे नाव आहे.

मुकेशने पोटाच्या आजारास कंटाळुन १ जुलै सोमवार रोजी मध्यरात्री आपल्या राहत्या घरातील छताला साडीने गळफास घेत आत्महत्या केली. दरम्यान घटना उघडकीस आली असता मुकेशला रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याला मयत घोषित करण्यात आले. यावल पोलीस ठाण्यात मयताचा भाऊ राकेश माधव गजरे यांनी दिलेल्या खबरी वरून अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ सिकंदर तडवी हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.