सुगरण पक्षांची घरट्यांसाठी धांदल..

बहिणाईच्या कवितेची आली प्रचीती..

0

 

रावेर 

 

अरे, खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला,

देखा पिलासाठी तिनं झोका झाडाला टांगला..

सुगरण पक्षांच्या घरट्यांवर कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची कविता किती सार्थ आहे, याचा प्रत्यय सुगरण पक्षाची आपले घरटे बांधण्यासाठी सध्या सुरू असलेली कसरत पाहून येत आहे. रावेर तालुक्यात मृर्ग नक्षत्राच्या समाधानकारक सरी कोसळल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असताना देवढाच उत्साह घेऊन सुगरण पक्षांचे घरटे बांधण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहे.

पावसाळा सुरू होताच शेतकरी शेतीच्या कामात मग्न झालेला असतानाच निसर्गातील सुगरण पक्ष आपल्या घरटे बांधण्यात मग्न झाला आहे. पावसापासून आपल्या पिल्लांचे संरक्षण करण्यासाठी सुगरण पक्षी आपला पूर्ण वेळ आणि कौशल्य वापरून गवताची एक एक काडी जमवून आपले घरटे पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा करीत असल्याचे चित्र दिसत आहे. पाण्याच्या ठिकाणी एखाद्या मजबूत झाडाच्या फांदीच्या शेवटच्या टोकाला गवताच्या सहाय्याने भरभक्कम गाठ मारून घरटे पाण्याच्या दिशेला टांगते राहील, याची दक्षता सुगरण पक्षांकडून घेतली जात आहे.

सुगरण पक्षी हा प्रामुख्याने घरटे बांधण्यास सुरुवात करतो. मादी पक्षाला जे घरटे पसंत होईल ती त्या घरट्यामध्ये प्रवेश करते. राहिलेले काम पूर्णत्वास नेण्यास ती ही नर पक्षाला मदत करत असते. आपल्या पिल्लांना उबदार गालिच्चा मिळावा म्हणून शेतामध्ये आजूबाजूला पडलेली मऊ पीसं , गवत, उबदार कापडाचा तुकडा असे साहित्य ते जमवते. त्या घरट्यांमध्ये आपल्या पिल्ल्यांना थंडीपासून संरक्षणासाठी तजवीज करीत घरट्यांच्या सुबक आकाराकडे लक्ष देत असते, पक्षी निरीक्षणे सांगितले.

 

असं असतो सुगरणीचा खोपा

सुबक आकाराची घरटी सर्वसाधारणपणे दीड ते अडीच फुटापर्यंत उंचीची असतात. निमुळते ते प्रवेशव्दार त्यानंतर सुरक्षित असा एक फुटाचा भाग. नंतर खोपा त्या खोप्यालाही मजबूत गवत काडीने डेरेदार आणि डोलदार विशिष्ट आकार देऊन रचना केलेली घरटे अत्यंत सुबक दिसते. काही घरटी तर खोप्यामध्ये खोपा अशा दुहेरी खोप्यांची अत्यंत कौशल्याने त्यांनी तयार केलेली असतात. निमुळत्या फांदीला आपल्या पायाच्या नखाच्या आणि चोचीच्या सायन मजबूत गवताच्या भक्कम गाठी बांधून हे घाटे विणण्यास सुरुवात होते त्याचे विणकाम आणि चोचीतून व पायाच्या नखाद्वारे गवताची काडी विणत त्याला सुबक आकार देण्याचे त्याचे हे कौशल्य पाहणाऱ्यांचेही भान हरकून टाकणारे असते.

 सुगरण पक्षाची विशेषता

सुगरण नर पक्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी घरटे बनवण्यास सुरुवात करता, घरटे बनवल्यानंतर सुगरण मादी पक्षी ही वेगवेगळ्या सुगरण नर पक्षांनी बनवलेल्या घरट्यांचे निरीक्षण करते त्याची मजबुती तपासते, जे जे घरटे सर्वात मजबूत बनवलेले असेल त्या घरट्यांमध्ये नर पक्षांची निवड करते,

 विनीच्या काळामध्ये रंग पिवळा होतो, त्यानंतर सुगरण नर मादी पक्षी मिळून घरटे पूर्ण करतात व मादी पक्षी ही अंडे देण्यास सुरुवात करते. सुगरण पक्षास (Baya waver) शास्त्रीय नाव- Ploceus philippi असे देण्यात आलेले आहे. सुगरण पक्षी हे गुंतागुंती मध्ये त्यांची घरे बांधतात त्यामुळे त्यांना पक्षांचा इंजिनियर म्हणतात.

 

पावसापासून आपल्या पिल्लांचे संरक्षण करण्यासाठी सुगरण पक्षी आपला पूर्ण वेळ आणि कौशल्य आपण आपले घरटे पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्नाची प्रकाश टाक करीत असल्याचे चित्र दिसत आहे.

 

“यावल वन विभागातील ठिकठिकाणी सुगरण पक्षांचे घरटे बघायला मिळतात, विशेषता रावेर वन क्षेत्रात सातपुडा जंगल सफारी भागात फिरस्ती दरम्यान सुगरण पक्षांचे बनवलेले घरटे बघायला मिळतात, सातपुडा जंगल सफारी भागात सुगरण पक्षाने बनवलेला घरट्यांचा अनुभव घेण्या कामी यावे..”

श्री जमीर एम. शेख, उपवनसंरक्षक, यावल वन विभाग जळगाव

Leave A Reply

Your email address will not be published.