धक्कादायक.. विषारी दारू प्यायल्याने 21 जणांचा मृत्यू

0

गुजरात, लोकशाही न्यूज नेटवर्क 

गुजरातमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दारूबंदी असलेल्या गुजरातमध्ये विषारी दारू प्यायल्याने 21 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 47 हून अधिक लोक अजूनही रुग्णालयात दाखल आहेत.

गुजरातमधील बोटाद जिल्ह्यातील रोजिड गावात बनावट दारू पिऊन किमान 21 जणांचा मृत्यू झाला आहे.  गुजरातचे गृहसचिव राजकुमार यांनी सांगितले की,  या घटनेला गांभीर्याने घेण्यात आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. अनेक जणांची प्रकृती अस्थिर आहे. या लोकांना भावनगर, बोटाद आणि अहमदाबादला पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. गुजरातमध्ये दारूबंदी आहे.

या लोकांना 40-40 रुपयांना मिळणारे दारूचे छोटे प्लास्टिकचे पॅकेट विकत घेतले होते. गुजरातमध्ये अशाच बंडलमध्ये अवैध दारू विकली जाते. आरोपींना दारूच्या नावावर केमिकलचा पाऊच बनवून थेट लोकांना विकल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.