दरोडाप्रकरणी २० लाखांचे सोने हस्तगत

0

चोपडा :– शहादा येथील घरफोडित चोरलेले सोने पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपींनी चोपडा शहरातील माणक ज्वेलर्सचे संचालक नवीन प्रवीण टाटिया यांना विकल्याचे सांगितल्यावरून चार दिवसात दुसऱ्यांदा प्रवीण टाटिया यांचा मुलगा नवीन टाटिया यांची चौकशी करून शहादा पोलिसांनी त्याच्या कडून चोरीचे घेतलेले २० लाख रुपये किंमतीचे २७ तोळे सोने हस्तगत केले आहे. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे ३१ डिसेंबर २०२३ रोजी वसंत लक्ष्मण शहा (वय ८०, रा. पाटळदा, ता. शहादा) यांच्या घरी धाडसी घरफोडीची घटना घडली होती. यात चोरट्यांनी लाखो रुपयांचे सोने, चांदीचा ऐवज चोरून पोबारा केला होता. याप्रकरणी राहुलसिंग मोतीसिंग भाटिया (वय २५) या आरोपीस अटक करण्यात आली असून इतर दोघे फरार आहेत. आरोपीने यातील चोरीचे काही दागिने चोपडा येथील माणक ज्वेलर्स या दुकानात विकल्याची कबुली दिली होती. त्यावरून नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखा आणि शहादा पोलीस तपास करत होते. तेथील दोन्ही पथके चोपडा येथील माणक ज्वेलर्सचे संचालक नवीन टाटीया यांच्या मागावर होते. त्यात त्यांच्याकडून चोरीचे घेतलेले २० लाख रुपये किंमतीचे २७ तोळे हस्तगत करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.