अंतराळात पेटवली मेणबत्ती

0

बीजिंग: पृथ्वीवर आपण मेणबत्ती पेटवली तर त्याची ज्योत पाण्याच्या थेंबाच्या आकाराची असते. याचे कारण गुरुत्वाकर्षण हे असते. नुकतेच चीनच्या अवकाश यात्रींनी त्यांच्या तिऑनगॉग अंतराळ स्थानकात २१ सप्टेंबरला आगपेटीची काडी जाळली आणि मेणबत्ती पेटवली. मानवाच्या अंतराळ इतिहासातला हा प्रयोग प्रथमच करण्यात आला. आगपेटीची काडी जळली. ज्योत निघाली, पण ती

पृथ्वीवर आगकाडी पेटवली तर गरम हवा वाढते आणि थंड हवा खालच्या दिशेने फेकली जाते आणि पाण्याच्या थेंबासारखी ज्योत निर्माण होते. गुरुत्वीय बल नसलेल्या ठिकाणी ज्योत गोलाकार दिसते म्हणजे सर्वच दिशांनी ती पेट घेते, असे अवकाशात जाळलेल्या मेणबत्तीच्या ज्योतीवरून दिसले.

तिऑनगॉग अंतराळस्थानकातून

अंतराळवीरांसाठी वर्ग घेतला जातो. यात तिथल्या प्रयोगांची माहिती दिली जाते. चौथा वर्ग सुरू असताना ग्वै हायचावे याने इयू येन्गइयू यांच्या हातातली मेणबत्ती काडेपेटीने पेटवून दाखवली. अंतराळ स्थानकात वास्तव्य करण्यासंबंधी अनेक कठोर नियम आहेत. त्यातला एक असा की ज्वलनशील असा पदार्थ तिथे नेता येत नाहीत, तरीही. प्रयोगासाठी चिनी अंतराळवीरांनी मेणबत्ती आणि काडेपेटी नेली.

Leave A Reply

Your email address will not be published.