गडाच्या घाट रस्त्यावर कोसळला सहा टनाचा दगड

0

 

पुणे 

 

सध्या पावसाळा सुरु आहे. त्यामुळे पर्यटनासाठी सुंदर वातावरण तयार झाले आहे. या नयनरम्य वातावरणात अनेक पर्यटक विविध गड किल्यांवर फिरण्याचा आनंद घेत असतात. मात्र अश्या वेळी काळजी घेऊन प्रवास करण्याचे आवाहन नेहमीचं केले जाते. पावसाळ्यात अनेकवेळा निसर्गक अपघातून हानी होण्याची शक्यात अधिक असते. अशीच एक घटना सिंहगड किल्याच्या घाटात घडली

सिंहगड किल्ल्याच्या घाट रस्त्यावरील जगताप माची जवळ सोमवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. या दरडीत तब्बल ६ टनाचा दगड कोसळला. त्यावेळी स्त्यावर कोणी नसल्याने सुदैवाने जिवितहानी टळली. दरडी संरक्षित करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करुनही दरवर्षी पावसाळ्यात सिंहगड घाट रस्त्यावर दरडी कोसळत आहेत. त्यामुळे पर्यटकांवर दुर्घटनांची टांगती तलवार कायम आहे.

 

ब्रेकरच्या सहाय्याने फोडला दगड

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू कराव्यात अशी मागणी मावळा जवान संघटनेने केली आहे. भरपावसात प्रयत्न करूनही जेसीबी मशीनलाही दगड बाजुला हटविता आला नाही. त्यामुळे वन विभागाने अखेर ब्रेकरच्या साह्याने महाकाय दगड फोडण्यास सुरुवात केली. चार तासांनंतर दुपारी दीड वाजता महाकाय दगड फोडण्यात यश आले.

 

मार्ग झाला बंद

घाट रस्त्याच्या मधोमध महाकाय दगड आणि दरडीचा मलवा कोसळल्याने कल्याण, कोंढणपूर भागातून डोणजे, पुण्याकडे येणाऱ्या, जीप, दुधाचे टेम्पो आदी वाहने पहाटे पासून अडकून पडली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.