सेन्सेक्सची आकाशात भरारी; निफ्टीही जोमात

सेन्सेक्स ७९ हजार प्लस तर निफ्टीचा २४ हजारांचा रेकॉर्ड

0

 

मुंबई 

शेअर बाजारात भयंकर तेजी निर्माण झाली आहे. त्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी सातत्याने नवनवीन रेकॉर्ड नोंदवत आहे. भारतीय शेअर बाजारात गुरुवारी तुफान तेजी दिसून येत आहे. आज गुरुवारी सुद्धा दोन्ही निर्देशांकांनी नव्या विक्रमाला गवसणी घातली. मुंबई सेन्सेक्सने आता ७९ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. तर निफ्टीने २४ हजारांचा नवीन रेकॉर्ड नावे केला आहे. व्यापारी सत्रात नवीन उच्चांकावर पोहचल्यानंतर दोन्ही निर्देशांक खाली घसरले. त्यानंतर ते सावरले. सेन्सेक्स १९६.१९ अंकांसह ७८, ८७९.५४ अंकावर व्यापार करत होता. तर निफ्टी ३८.२५ अंकांसह २३, ९०० अंकावर होता.

 

 

सेन्सेक्सचे सर्व रेकॉर्ड ब्रेक

बीएसई सेन्सेक्सने आज ७८, ७७१.६४ हा नवीन विक्रम गाठला. काल बीएसई निर्देशांक ७८७५९.४० या स्तरावर पोहचला होता. तर मंगळवारी सेन्सेक्स ७८ हजारांच्या घरात होता. म्हणजे अवघ्या तीन दिवसात सेन्सेक्सने नवनवीन रेकॉर्ड नावावर केले आहेत. बाजार सकाळापासूनच एका मर्यादेत व्यापार करत होता. सेन्सेक्सचे ३० मधील १२ शेअर उसळीसह कारभार करत आहेत. तर १८ शेअरमध्ये घसरण आली आहे. अल्ट्राटेक सिमेंटने मोठी झेप घेतली आहे. कंपनी आज बाजारात टॉप गेनर ठरली. तर त्यानंतर जेएसडब्ल्यू स्टीलने मोठी दमदार कामगिरी केली.

 

बाजार उघडला तेव्हा बीएसईवरील सूचीबद्ध शेअरचे बाजारातील मूल्य ४३७.०२ लाख कोटी रुपये होते. तर बाजार उघडल्याच्या अर्ध्या तासातच ते ४३८.४६ लाख कोटींवर पोहचले. तर बाजार उघडल्यानंतर एका तासातच १०.१२ वाजता मार्केट कॅप ४३९.०७ लाख कोटी रुपये झाले. बीएसईवरील ३२९६ शेअरपैकी २०६० शेअर्समध्ये वाढ दिसून आली. तर ११२२ शेअरमध्ये घसरण दिसली. ११४ शेअर कोणत्याही बदलाशिवाय व्यापार करत आहेत.

 

या शेअरने लावेल चार चाँद

अल्ट्राटेक सिमेंट, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरने चार चाँद लावले. तर आशिया बाजारात दक्षिण कोरियातील कॉस्पी, जपानचा निक्की, हाँगकाँगचा हँगसँग आणि चीनच्या शंघाई कम्पोझिटमध्ये मोठे नुकसान झाले.

 

बीएसईवर आज २६९२ शेअरमध्ये ट्रेडिंग सुरु आहे. त्यातील १७५७ शेअर दमदार कामगिरी करत आहेत. तर ८३६ शेअर्समध्ये घसरण दिसत आहे. ९९ शेअरमध्ये कोणताही बदल झालेला नाही. याशिवाय १३४ शेअर असे आहेत जे वर्षभराच्या उच्चांकावर आहेत. तर १२ शेअर हे वर्षभराच्या निच्चांकवर आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.