चमचमीत रोस्टेड रेड बेल पेपर पास्ता

0

खाद्यसंस्कृती विशेष 

आपण पास्ताचे अनेक प्रकार पहिले असाच एक चमचमीत प्रकार म्हणजे रोस्टेड रेड बेल पेपर पास्ता.. पास्ता हा लहान मुलांना प्रचंड आवडतो.. चला तर मग पाहूया रोस्टेड रेड बेल पेपर पास्ता कसा बनवायचा..

 

साहित्य:

* २५० ग्रॅम पास्ता (कुठलाही तुमच्या आवडीप्रमाणे)

* ४ मध्यम रेड बेल पेपर /लाल सिमला मिरच्या

* २ मध्यम कांदा, चिरून

* ६ ते ८ पाकळ्या लसूण, चिरून

* १ टीस्पून काळी मिरी पूड किंवा ताजी क्रश करून

* १ टीस्पून मिक्स हर्ब्स

* १ टीस्पून चिली फ्लेक्स

* १/२ टीस्पून मिरची पूड

* १/४ कप हेवी क्रीम (अमुल फ्रेश क्रीम)

* ४ टेबलस्पून बटर

* १ टेबलस्पून ऑलिव ऑईल

* १ कप पाणी अंदाजे

* मीठ- चवीप्रमाणे

* २ टेबलस्पून पार्सली किंवा कोथिंबीर, बारीक चिरून

* पामेझान चीज किंवा प्रोसेसड/साधे चीज, किसुन- आवडीप्रमाणे

 

कृती:

* पाकिटावर दिलेल्या सुचनेप्रमाणे मीठ पाण्यात घालून पास्ता शिजवून घ्या. नंतर चाळणीत ओतून पाणी गाळा.

* नंतर थंड पाण्याखाली धरून सर्व पाणी निथळून घ्या. जरासे ऑईल किंवा बटर चोळून ठेवले तर एकमेकांना चिकटणार नाही.

* भरतासाठी वांगे भाजतो त्याप्रमाणे गॅसवर लाल सिमला मिरच्या भाजून घ्या.

* एका भांड्यात किमान १५ मिनिटे झाकून ठेवा, त्यामुळे साले सहज काढता येतात. नंतर करपलेली साले काढून मिरच्या कापून घ्या.

* एका मोठ्या नॉन-स्टिक पॅनमध्ये २ टेबलस्पून बटर गरम करून त्यात कांदा व लसुन गुलाबी रंगावर परतून घ्या. नंतर त्यात भाजलेल्या लाल सिमला मिरचीचे तुकडे आणखी थोडावेळ परतून घ्या आणि थंड झाल्यावर मिक्सरमध्ये एकजीव वाटून घ्या.

* नंतर त्याच पॅनमध्ये २ टेबलस्पून बटर व ऑलिव ऑईल गरम करून त्यात सिमला मिरचीचे वाटण, पाणी, मिरची पूड, मिक्स हर्ब्स, चिली फ्लेक्स, काळी मिरी पूड आणि मीठ टाकून छान मिक्स करून उकळी आणा. हा तयार झाला रेड पेपर सॉस.

* आच मंद करून त्या सॉसमध्ये क्रीम टाकून ढवळावे व उकडलेला पास्ता टाका.

* पास्ता सॉसमध्ये मिक्स करून घ्या. मंद-मध्यम आचेवर पास्ता सॉसमध्ये परतवा. सुका होवून देवू नका.

* गरम गरम पास्ता प्लेटमध्ये काढून त्यावर जराशी पार्सली आणि आवडीप्रमाणे पामेझान चीज भुरभुरा.

 

अपर्णा स्वप्निल कांबळे-नांगरे

पत्रकार/फुड ब्लॉगर, मुंबई

मो. ९८९२१३८१३२

Leave A Reply

Your email address will not be published.