रोझलँण्ड इंग्लिश मीडियम स्कुलमध्ये खिमानी मॅडम यांना आदरांजली

0

जळगाव ;- श्रीमती दौलत. एस . खिमानी मॅडम यांचे आज दिनांक :- १६जून रोजी १६ वे पुण्यस्मरण असल्याने त्यांना आज रोझलँण्ड इंग्लिश मीडियमचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद कर्मचाऱ्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

भविष्याचा वेध घेणारे, प्रगतिशील व्यक्तिमत्व श्रीमती दौलत एस खिमानी मॅडम. रोझलँण्ड इंग्लिश मिडीयम रिंग रोड जळगांव.
ज्या काळात इंग्रजी माध्यमाचे शिक्षण परवडणारे नव्हते , त्या काळात मिसेस दौलत एस.खिमानी यांनी जळगावातील गरीब व सामान्य मध्यम वर्गातून आलेल्या मुलांना इंग्रजी शिक्षण परवडणारे केले.

१९७४ मध्ये Knowledge is power ही मिशन एस.पी. खिमानी यांच्या सहकार्याने रोझलँण्ड इंग्लिश मीडियम स्कूलची स्थापना जळगाव येथे केली. श्रीमती खिमानी मॅडम ह्या आदर्श शिक्षिका होत्या. आज १६ जून ही श्रीमती दौलत खिमानी मॅडम यांची पुण्यतिथी आणि २०२३- २४ हे वर्ष त्यांनी केलेल्या या विद्यादेवतेच्या मंदिराचे ५० वर्षे पूर्ण होत आहे.त्यानिमित्त म्हुख्याध्यापकांसह शिक्षक वर्गाने अभिवादन केले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.