रेशन कार्ड धारकांना मोदी सरकारचा मोठा दिलासा !

0

नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क 

मोदी सरकारने आपल्या तिसऱ्या कार्यकाळात रेशन कार्ड धारकांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारने आधार आणि रेशन कार्ड लिंक करण्याची तारीख आणखी पुढे ढकलली आहे. यावेळी सरकारने तीन महिन्यांनी मुदत वाढवली आहे. यापूर्वी आधार आणि रेशन कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख ३० जून होती. ती आता 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिसूचना अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने जारी केली आहे.

सरकारने ‘वन नेशन-वन रेशन कार्ड’ची घोषणा केल्यापासून रेशन कार्ड आधारशी लिंक करणे अनिवार्य केले आहे. एकापेक्षा अधिक रेशनकार्ड असलेले लोक वेगवेगळ्या ठिकाणांवरून मोफत रेशनचा लाभ घेत असल्याची माहिती सरकारला मिळाली आहे. याला आळा घालण्यासाठी रेशन कार्ड आधारशी लिंक करण्यावर भर दिला जात आहे. याशिवाय, अनेक लोक मृत व्यक्तींच्या रेशन कार्डवरही लाभ घेत आहेत. यामुळे गरजू लोकांचे नुकसान होते. असे, सर्व प्रकार थांबवण्यासाठी सरकारने रेशन कार्ड आधारशी लिंक करणे अनिवार्य केले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.