आनंदवार्ता : येत्या पाच दिवसात महाराष्ट्रभरात पाऊस

कर्नाटक, केरळ भागात कमी दाबाच्या पट्टा : अरबी समुद्रात पावसाला पोषक वातावरण

0

 

मुंबई | लोकशाही न्यूज नेटवर्क

कर्नाटक, केरळ भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे अरबी समुद्रात मान्सूनच्या प्रवासाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. अशी माहिती हवामान विभागाकडून मिळत आहे. परिणामी महाराष्ट्रभारत येत्या पाच दिवसात सर्वदूर पाऊस कोसळणार आहे. पावसाआभावी खोळंबलेल्या पेरण्या आता सुरू होणार असल्याने बळीराजालाही काहिसा दिलासा मिळणार आहे.

 

दरम्यान मुंबई उपनगरातील कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर, गोरेगाव, अंधेरी परिसरात काळ्याकुट्ट ढगांसह मुसळधार पडत आहे. या भागात सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे. तर काल भिवंडी, कल्याण, डोंबिवली आणि ठाणे या भागात पावसाची तुफान पाऊस झाला. यामुळे सखल भागात या मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याचे पाहायला मिळाले होते. तर बाजारपेठा देखील पाण्याखाली गेल्या होत्या.

राज्यभरात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाल्याने पावसाची प्रतीक्षा संपणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.