पंजाबराव डख यांचा मोठा अंदाज ; राज्यात १२ जूनला मान्सून पोहचणार

0

मुंबई ;- राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये कडक उन्हाळ्यामुळे नागरिकांना अडचणीत वाढ होत आहे. अनेक जिल्ह्यात सध्या पारा 40 अंशापेक्षा जास्त आहे. यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक देखील मान्सूनची वाट पाहत आहे.

तर दुसरीकडे मान्सूनच्या आगमनाबाबत हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख यांनी मोठा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यात मान्सूनपूर्व पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. यंदा मान्सून 22 मे रोजी अंदमानात पोहोचेल. मान्सून साधारणपणे 22 मे रोजी अंदमानात दाखल होतो.

पंजाबराव म्हणाले की, महाराष्ट्रात 12 ते 13 जूनच्या सुमारास मान्सूनच्या पावसाला सुरुवात होईल. मात्र, राज्यात पेरणीसाठी योग्य पाऊस 22 जूननंतर सुरू होईल. महाराष्ट्रात 25 ते 27 जून दरम्यान हंगामातील पहिला चांगला पाऊस पडेल.

यंदा मान्सूनचा जोर अधिक वाढणार असून जुलै महिन्यात अधिक पाऊस पडेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. तर ऑगस्ट महिन्यात कमी पाऊस पडेल. त्यानंतर पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात मुसळधार पाऊस पडेल. एकंदरीत यंदा चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.