मुख्याध्यापकाला दहा हजाराची लाच भोवली

सापळा रचून रंगेहाथ अटक : एलसीबीची कारवाई

0

 

जळगाव | लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

एरंडोल तालुक्यात थकीत वेतनातील फरकाची रक्कम मंजूर करण्याच्या मोबदल्यात १० हजाराची लाच स्वीकारताना मुख्याध्यापकला जळगाव एलसीबीकडून अटक करण्यात आली आहे. संदीप प्रभाकर महाजन (वय-४४, रा. नेपाने ता. एरंडोल) असे लाचखोर मुख्याध्यापकाचे नाव असून शैक्षणिक क्षेत्राला काळीमा फासणारी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

 

सविस्तर असे की, एरंडोल तालुक्यातील निपाणेतील श्री संत हरिहर हायस्कूलमध्ये तक्रारदार शिपाई पदावर कार्यरत आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांचे वेतनातील फरकाची रक्कम २ लाख ५३ हजार ६७० रुपये मंजूर करण्याचा प्रस्ताव त्यांनी जळगाव माध्यमिक शिक्षण विभागाचे अधीक्षक त्यांच्याकडे पाठवला होता. दरम्यान हा प्रस्ताव मंजूर करून देतो असे सांगून याच शाळेत मुख्याध्यापक असणारे संदीप महाजन यांनी मंजूर रकमेच्या ५% म्हणजे १२,५०० रुपयांची लाचेची मागणी केली.

 

दरम्यान तडजोडी यांची १० हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार तक्रारदार यांनी जळगाव येथील विभागाला तक्रार दिली. पथकाने गुरुवारी २७ जून रोजी दुपारी सापळा १० हजाराची रक्कम स्वीकारताना मुख्याध्यापक संदीप महाजन यांना पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी कासोदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

 

जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, पीएसआय दिनेशसिंग पाटील, पोलीस नाईक बाळू मराठे आदींनी सापळा रचून ही कारवाई केली. सदर घटनेने शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.