तारखेडा येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

जुगार अड्डे चालविणऱ्यांचे धाबे दणाणले

0

 

पाचोरा | लोकशाही न्युज नेटवर्क

 

तालुक्यातील तारखेडा येथे शेत शिवारात जुगार अड्ड्या सुरू असल्याची गोपनीय माहिती पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अशोक पवार यांना मिळाली. दरम्यान नंतर अशोक पवार यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे यांचेसह पथक घटनास्थळी रवाना केले असता घटनास्थळावरून ३७ हजार रोख रकमेसह २ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत ७ संशयित आरोपींविरुद्ध पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, तारखेडा खु” ता. पाचोरा येथील दिलीप रामदास पाटील यांच्या शेतात बंद पत्र्याच्या शेडमध्ये झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळला जात असल्याची गोपनीय माहिती पाचोरा पोलिसांना मिळाली. घटनास्थळी सहाय्यक पोलिस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे, पो. काॅ. विनोद बेलदार यांनी धाड टाकली.

 

घटनास्थळावरून अर्जुन भिका नाईक, प्रदिप उर्फ पिंटु उत्तम गायकवाड, विजय मधुकर नाईक, दिलीप रामदास पाटील सर्व रा. तारखेडा ता. पाचोरा, राहुल सुरेश पाटील रा. नगरदेवळा ता. पाचोरा, विकास पृथ्वीराज पाटील रा. निंभोरा ता. भडगाव यांना ताब्यात घेत त्यांची झडती घेतली.तपासणीत ३७ हजार रुपये रोख, ४० हजार रुपये किंमतीचे ३ मोबाईल, १ लाख ५५ हजार रुपये किंमतीच्या ५ मोटरसायकल व पत्त्यांचा कॅट असा एकुण २ लाख ४० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करत जुगार खेळणाऱ्या बहुसंख्य ७ जणांसह इतर ४ ते ५ अनोळखी इसमांविरुद्ध पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे हे करीत आहे. पोलिसांच्या या धडक कारवाई मुळे परिसरातील अवैधरित्या सुरु असलेल्या जुगार अड्डे चालविणऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.