पाळधी येथे ना. गुलाबराव पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह

भाविकांमध्ये बसून पालकमंत्री घेताहेत कीर्तन श्रवणाचा लाभ ; पंचक्रोशीतून भाविकांची उपस्थिती

0

भूषण महाजन

पाळधी, ता.  धरणगाव -;-  राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांचा अभिष्टचिंतन  सोहळ्या निमित्त अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे २६ मे ते २ जून २०२४ दरम्यान आयोजन करण्यात आले असून स्वतः पालकमंत्री गुलाबराव पाटील हे भाविकांमध्ये बसून कीर्तन श्रवणाचा लाभ घेत आहे . याअखंड हरिनाम कीर्तन सोहळ्याला पंचक्रोशीतून भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभत आहे.  येथील जीपीएस मित्रपरिवार, विकी बाबा युवा मंच, शिवसेना युवा सेना शाखा तसेच समस्त ग्रामस्थ पाळधी यांच्या संयुक्त विद्यमाने या कीर्तन सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे.

या कीर्तन सप्ताहाला राज्यभरातील नामवंत कीर्तनकारांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पहिल्या दिवशी ह,भ,प शिवा महाराज बावस्कर तेल्हारा, दुसऱ्या दिवशी ह भ प शिवलीला ताई पाटील बार्शी, तिसऱ्या दिवशी  ह भ पसमाधान महाराज भोजेकर, चौथ्या दिवशी ह भ प  सोपान महाराज शास्त्री सानप आळंदी, पाचव्या दिवशी ह भ प पुरुषोत्तम महाराज बुलढाणाकर, सहाव्या दिवशी ह भ प ज्ञानेश्वर महाराज पाळधीकर, सातव्या दिवशी हा भ प विशाल महाराज शोले मुक्ताईनगर, शेवटच्या दिवशी म्हणजेच २ जून २०२४ रोजी ह भ प गजानन महाराज वरसाडेकर यांचा काल्याच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.

किर्तन सोहळ्याच्या निमित्ताने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे ज्येष्ठ चिरंजीव तथा मा.जि प सदस्य प्रतापराव पाटील यांच्या संकल्पनेतून कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ते स्वतः देखील परिसरातील कुठल्याही गावात कीर्तनाचा कार्यक्रम असले तर ते आवर्जून त्या कीर्तन सोहळ्याला उपस्थित राहतात.

प्रत्येक दिवशी गावातील विविध मंडळाच्या सदस्यांना बोलवून महाराजांचा स्वागत सत्कार करण्यात येत आहे. या प्रसंगी मृदुंगाचार्य यज्ञेश महाराज यांची जुगलबंदी पाहण्याची मजाच वेगळी असल्याचे बोलले जात असते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  जीपीएस मित्रपरिवार, विकी बाबा युवा मंच, शिवसेना, युवासेना पाळधी परिसरातील ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत .

Leave A Reply

Your email address will not be published.