पळासखेडा ग्रामपंचायतीत दीड लाखांचा अपहार

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  

तालुक्यातील पळासखेडा ग्रामपंचायतीत सन 2019/2020 या वर्षी ०१ लाख ४६ हजार रुपयांचे पेव्हर ब्लॉक बसवण्याचे अनुदान प्राप्त झाले होते. परंतु कामाची प्रत्यक्ष पाहणी दरम्यान कुठलेही काम आढळून आले नसून दीड लाखाचा मलिदा वरच्यावर खाल्ला व शासनाची फसवणूक करून अपहार केल्याप्रकरणी तात्कालीन जि. प. उपअभियंता, शाखा अभियंता, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक यांच्यावर भडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी भालचंद्र नाटू पाटील, धंदा. विस्तार अधिकारी पंचायत समिती भडगाव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, भडगाव तालुक्यातील पळासखेडा ग्रामपंचायतीला सन 2019/2020 मधील पंचायतीला 25/15 या लेखा शिर्षाखाली पेव्हर ब्लॉक बसवण्याचे अनुदान प्राप्त झाले होते. व त्यात झालेल्या पेव्हर ब्लॉक बसवण्याचे कामात पळासखेडा येथील शिवाजी पाटील ते बहादुर पाटील यांच्या परिसरात 99 चौरस मीटर, तुकाराम पाटील 25.84 चौरस मीटर, रतीलाल्ल पाटील 42.05 चौरस मीटर या ठिकाणी सदरची प्रत्यक्ष पाहणी संजय बी. लखवाल सहाय्यक गट विकास अधिकारी भडगाव यांनी केली असता त्यांना त्या ठिकाणी कोणतेही काम आढळून आले नाही.

म्हणून आरोपी  तत्कालीन उपअभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग एरंडोल संदीप लक्ष्मण शेलार, तत्कालीन शाखा अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग योगेश नंदकिशोर थोरात, तत्कालीन विस्तार अधिकारी (संखिकी) निवृत्त पंचायत समिती भडगाव धनसिंग परशुराम राजपूत,  तत्कालीन ग्रामसेवक ग्रामपंचायत पळासखेडा हल्ली ग्रामसेवक ग्राम पंचायत तांदुळवाडी ता. भडगाव राजेंद्र पिराज सोनवणे  यांनी सदर कामात रक्कम रुपये 1,46,420/- (एक लाख शेहेचाळीस हजार चारशे वीस) एवढ्या रकमेचा अपहार करून फसवणूक केली म्हणून भडगाव पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र. न.232/2022 भा. द.वी. कलम 420,409,406,34, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश वाघमारे हे करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.