शेतकऱ्याचा नाद खुळा….! : म्हशीच्या आठवणीत बनवले ४५ हजाराचे पेंटिंग

0

 

पुणे

शेतकरी आणि प्राणी यांचे अनेक वर्षांपूर्वीचे नाते आहे. बैल, गाय, म्हैस, कुत्रा हे प्राणी शेतकऱ्यांशी जोडलेले असतात. या प्राण्यांसाठी शेतकरी काहीही करायला तयार होतो. यातच मावळ तालुक्यातील एका प्रगतशील शेतकऱ्याने आपल्या म्हशीच्या मृत्युंनंतर त्याने तिच्या आठवणीत चक्क ४५ हजारांचे पेंटिंग तयार करून त्यांनी ते त्याच्या डेअरीमध्ये लावले आहे. त्या पेंटिंगची मावळ मध्ये चर्चा रंगली आहे.

 

मावळ तालुक्यातील दारूंब्रे येथील राहणारे प्रगतशील शेतकरी संदीप सोरटे यांचा दुधाचा व्यवसाय आहे. गेल्या २९ वर्षपासून ही म्हैस या शेतकऱ्याने पाळली होती. तिच्या जन्मापासून सांभाळलेल्या या म्हशीला शेवटपर्यंत सांभाळायचे हा त्यांचा मानस होता. मात्र मध्येच त्यांच्या वडिलांनी ही म्हैस विकली, मात्र संदीप यांनी ती पुन्हा विकत घेऊन परत घरी आणली.

 

निधनानंतर सर्व विधी पार पाडले

दरम्यान दि. २५ डिसेंबर २०२१ रोजी या म्हशीचे निधन झाले. तिच्या निधनंतर संदीप सोरटे यांनी तिचे सर्व विधी पार पाडले. आपण या मुक्या जिवासाठी काही तरी देणे लागतो. या भावनेतून संदीप सोरटे यांनी म्हशीची आठवण म्हणून त्या म्हशीचे ४५ हजार रुपये खर्च करून पेंटिंग बनवून घेतले. या म्हशीमुळे आपल्या व्यवसायात खूप प्रगती झाल्याचे संदीप सोरटे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.