दुर्दैवी: डोळ्यादेखत १५ वर्षीय मुलाला टँकरने चिरडल्याने जागीच मृत्यू

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क 

पाचोरा येथे मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. दुचाकीच्या अपघात सर्व खाली फेकले गेले. यातील १५ वर्षीय बालकाला भरधाव टँकरने चिरडल्याने त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बांबरुड फाट्याजवळ सोमवार, १७ जून रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. राजवीर नरेंद्र भोसले (वय १५ ) असे मयत बालकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव तालुक्यातील आमडदे येथे त्याचे वडील नरेंद्र भोसले हे राहतात. नरेंद्र भोसले यांचा वैद्यकीय व्यवसाय असल्याची माहिती मिळत आहे. सोमवार १७ जून रोजी नरेंद्र भोसले हे पाचोरा येथे पत्नी, मुलगा राजवीर आणि मुलगी यांच्यासह काही कामानिमित्त आलेले होते.

रात्री दहा वाजेनंतर घरी आमडदे येथे परत जात होते. वाटेत बांबरुड फाट्याजवळ पावसामुळे रस्ते निसरडे झाल्याने त्यांच्या वाहनाला अपघात झाला. दुचाकीवरून सर्व खाली पडले. त्यात राजवीर हा जवळून जाणाऱ्या टँकर खाली येऊन चिरडून ठार झाला. डोळ्या देखतच मुलाचा मृत्यू झाल्यामुळे भोसले परिवाराला मोठा धक्का बसला.

दरम्यान राजवीर आणि जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. राजवीर याला मयत घोषित करण्यात आले. तर नरेंद्र भोसले, त्यांच्या पत्नी व मुलीला किरकोळ खरचटल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.