बी.ए. सोशल सायन्सेस अभ्यासक्रमाची प्रवेशप्रकीया दि. १ जून पासून

0

जळगाव ;- कवय‍ित्री बहिणाबाई चौधरी उत्त्र महाराष्ट्र विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्रे प्रशाळेअंतर्गत ४ वर्षीय बी.ए. सोशल सायन्सेस अभ्यासक्रमाची प्रवेशप्रकीया दि. १ जून पासून सुरु होणार आहे.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानूसार विद्यापीठाच्या या प्रशाळेत गतवर्षापासून बी.ए.सोशल सायन्सेस (सामाजिक शास्त्र) हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. चार वर्षांच्या या अभ्यासक्रमात मेजर अर्थशास्त्र व राज्यशास्त्र आणि मायनर स्टॅटीस्टीक्स व मॅनेजमेंट अशी रचना उपलब्ध करुन देण्यात आली आहे.१२ वी उत्तीर्ण झाालेला विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र आहे. या अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता ३० अशी आहे. गतवर्षी २८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. या अभ्यासक्रमाअंतर्गत मल्टीपल एन्ट्री-एक्झिट, बहुविद्याशाखीय दृष्टीकोन,मातृभाषेत शिक्षण आदी वैशिष्टे आहेत. सोशल सायन्सेसचा विद्यार्थी विज्ञान अथवा वाणिज्य शाखेतील विविध व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमाचे अध्ययन करु शकेल. पहिले वर्ष उत्तीर्ण केल्यास बी.ए. सोशल सायन्सेसचे प्रमाणपत्र मिळेल. द्वितीय वर्ष उत्तीर्ण केल्यास बी.ए. सोशल सायन्सेसचे पदवीका प्रमाणपत्र, तिसरे वर्ष उत्तीर्ण केल्यास बी.ए. सोशल सायन्सेसचे पदवी प्रमाणपत्र आणि चौथे वर्ष उत्तीर्ण केल्यास बी.ए. सोशल सायन्सेस सोबत ऑनर्स पदवी विद्यार्थ्याला प्राप्त होणार आहे. दि. १ जून पासून या अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन पध्दतीने प्रवेश प्रकिया सुरू होणार आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर याबाबत माहिती देण्यात आली आहे. विविध स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना प्रशाळेत मार्गदर्शन केले जाते. रोजगारासाठी या पदवीचा उपयोग विद्यार्थ्यांना होणार आहे. अशी माहिती प्रशाळेचे प्रभारी संचालक प्रा.अजय पाटील यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.