छगन भुजबळांना आवरले पाहिजे !

निलेश राणे खवळले : युतीत ही भाषा शोभत नाही

0

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क 

भाजपच्या चारशे पारच्या नाऱ्यामुळे लोकसभा निवडणुकांवर नकारात्मक परिणाम झाला, अशी स्पष्ट आणि सडेतोड भूमिका अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे. भुजबळांच्या या मतावरुन माजी खासदार आणि नारायण राणेंचे सुपुत्र निलेश राणे चांगलेच खवळल्याचे दिसत आहे.  छगन भुजबळांना आवरले पाहिजे, मी भारतीय जनता पक्षाचा एक लहान कार्यकर्ता असलो तरी आम्ही नेहमी भुजबळांचे का ऐकून घ्यावे? असा प्रश्न निलेश राणे यांनी एक्स सोशल मीडिया अकाऊंटवरुन विचारला आहे. त्यामुळे महायुतीत सारे काही आलबेल नसल्याचे पाहायला मिळत आहे.

मी भारतीय जनता पक्षाचा एक लहान कार्यकर्ता असलो तरी आम्ही नेहमी भुजबळांचे का ऐकून घ्यावे? मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू असताना सुद्धा आम्ही त्यांची बाजू घेतली नाही, नेहमी नेहमी भुजबळ हे बीजेपीला डिवचत असतात ही त्यांची भूमिका बरोबर नाही. आम्हाला असेच पाहिजे आम्हाला तसेच पाहिजे, युती आघाड्या करून ही भाषा एका नेत्याला शोभत नाही. आम्ही तुमच्या वयाचा आदर करतो पण उठ सूट कोण युती बिघडवायची भाषा बोलत असेल तर सहन होत नाही आणि होणार नाही कारण भारतीय जनता पक्षाने सर्वात मोठा पक्ष असून सुद्धा नेहमी सकारात्मक भूमिका ठेवली आहे.

छगन भुजबळ काय म्हणाले?

भाजपच्या चारसौ पारच्या नाऱ्याचा निवडणुकीत महायुतीवर फार मोठा नकारात्मक परिणाम झाला. दलितांमध्ये सरकार संविधान बदलणार असल्याचा संदेश गेला. शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या समावेशाच्या चर्चांवरही त्यांनी भाष्य केले. आपल्याला महायुतीमध्ये योग्य तो वाटा मिळायला पाहिजे. आपण आलो, त्यावेळीही त्यांनी आपल्याला सांगितले की विधानसभेला 80 ते 90 जागा मिळतील, या वेळेला (लोकसभा) जी काय खटपट झाली, ती पाहता पुढे ही खटपट होता कामा नये. आम्हाला एवढ्या जागा मिळाल्या पाहिजेत, हे आधीच आपल्याला त्यांना सांगावे लागेल. तेवढ्या मिळाल्या तर 50 ते 60 निवडून येणार हो. 50 च घ्यायच्या… मग त्यातल्या काही गळाल्या की आम्ही आणखी खाली येणार. तसे होताच कामा नये, त्यामुळे आताच त्यांना सांगून टाकावे, आमचा वाटा आम्हाला मिळायला हवा, असे छगन भुजबळ राष्ट्रवादीच्या मुंबईतील बैठकीत म्हणाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.