१२ लाख रुपयांसाठी सुनेचा छळ ; नगरसेविके सह पुत्रावर गुन्हा…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

जळगाव मनपा च्या विद्यमान नगरसेविकेवर व पुत्रावर सुनेने माहेरून 12 लाख रुपये आणावे, यासाठी छळ केल्याप्रकरणी भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, भडगाव येथील माहेर असलेल्या रुपाली शुभम नेरकर (२४) यांना पती शुभम अनंत नेरकर याला नोकरी लावण्यासाठी माहेराहून १२ लाख रुपये आणावे यासाठी सासू व पतीकडून गेल्या ८ महिन्यापासून पैशाचा तगादा लावत शिवीगाळ व मारहाण तसेच शारीरिक व मानसिक छळ सुरु होता. याप्रकरणी फिर्यादी रुपाली शुभम नेरकर यांनी, भडगाव पोलिसात गु.र.न २५८/२०२२. भादवि ४९८अ, ३२३,५०४,५०६ आणि ३४ प्रमाणे नगरसेविका सरिता अनंत नेरकर व पती शुभम अनंत नेरकर यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पंचक्षीला निकम या करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.