जळगाव शहरात हत्यांचे सत्र सुरूच; दगडाने ठेचून तरुणाचा खून

0

जळगाव | जळगाव शहरात हत्यांचे सत्र सुरूच असून आज पुन्हा एका तरुणा दगडाने ठेचून खुन केल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. २७ वर्षीय तरूणाला दगडाने ठेचून ठार मारण्यात आले आहे. सागर वासुदेव पाटील असे मृत तरुणाचे नाव असल्याचे समोर आलेय.
याबाबत असे कि शहरातील कासमवाडी परिसरात भरणार्‍या आठवडे बाजारातील मच्छी बाजाराच्या भागात आज पहाटे एका तरूणाचा मृतदेह आढळून आला. या तरूणाचा चेहरा दगडाने ठेचला असून याची ओळख पटविण्यात अडचण आली. काही वेळाने हा तरूण सागर वासुदेव पाटील येथील असल्याची माहिती मिळाली. ईश्वर कॉलनी परिसरात सागर पाटील हा तरुण कुटुंबियांसह राहत होता.
दरम्यान, सागर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल असल्याचे समजते. या तरूणाला दगडाने ठेचून मारले असून याची माहिती मिळताच अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा, एमआयडीसेचे पोलीस निरिक्षक प्रताप शिकारे हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांना दोन संशयितांची नावे समजली असून त्यांचा शोध सुरू आहे. घटनास्थळी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञ देखील पोहचले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.