अहिराणी भाषिकांचा गौरव करत विश्व अहिराणी संमेलन संपन्न

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

साहित्यिकांची पंढरी म्हणूनही खान्देशाला वेगळी उंची आहे. अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके तव्हा मियते भाकर!’ अत्यंत सोप्या अहिराणी भाषेत खान्देश कन्या थोर कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी शेतीमातीचे सार मांडतांनाच मानवी भावनांचा तरल भवताल आपल्या कवितांमधून मांडला. आज जळगाव, धुळे, नंदुरबार व नाशिक व औरंगाबाद जिल्ह्यातील जवळपास दीड कोटी लोकसंख्या अहिराणी केवळ बोलत नाही तर जपत आहेत, तसेच मी ज्या विदर्भातून येतो मेळघाटातील अमरावती, परतवाडा, चांदूर बाजार परिसरातील सुमारे पन्नास गावांची भाषा देखील अहिराणीला मिळती जुळती आहे. त्यांच्या परंपरा, रूढी, लोकसाहित्य हे अहिराणी बोलीतीलच आहे. त्यामुळे खान्देश व विदर्भाचे हे एक अनोखे नाते आहे. म्हणून केवळ उद्घाटक म्हणून नव्हे तर विदर्भाचा पुत्र म्हणून माय अहिराणीच्या अहिराणी भाषिक बांधवाना बंधुत्वाच्या नात्याने भेटायला आलो असल्याचे गौरोवोद्गार राज्याचे माजी मुख्यमंत्री, विधानसभेचे विद्यमान विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काढले. ते उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ, संचलित व जागतिक अहिरानी भाषा संवर्धन परिषद आयोजित दुसरे ऑनलाईन विश्व अहिरानी संमेलन-2022 च्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथील सभागृहात आयोजित या उद्घाटन सोहळ्याला राज्याचे माजी जलसंपदा मंत्री खान्देश पुत्र आमदार गिरीष महाजन, संमेलनाचे स्वागताध्यक्ष व चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण, कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार एड.निरंजन डावखरे, पहिल्या विश्व अहिराणी संमेलनाचे अध्यक्ष बापूसाहेब हटकर, यावर्षीच्या संमेलनाचे अध्यक्ष डॉ.एस.के.पाटील, उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाचे अध्यक्ष विलास पाटील, अहिराणी भाषा संवर्धन परिषदेचे बापूसाहेब पिंगळे, चाळीसगाव पंचायत समितीचे गटनेते संजय भास्करराव पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

बोली मन्ही अहिराणी, जशी दहिमान लोणी, सगळा पारखी ताकनाइले पारखं नही कोणी. अशी कविता म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणाची सुरुवात अहिराणीने केली, तसेच सरवा खान्देशवासीयेसले आणि अहिराणी भाषिकेसले मनपासून राम राम… दुसरा ऑनलाईन विश्व अहिराणी संमेलन ना बठ्ठासले शुभेच्छा.!!! खान्देश नी जमीन कसदार शे, केळी, कपाशी, उस न आगर शे, साधू संत, महात्मा देशभक्त, येसना पदस्पर्श हाई खान्देश नी संपत्ती शे, खान्देशी माणूस याठल्या केळी ना पान सारखा भरेल आन ऊस ना रस सारखा गोड शे अश्या शब्दात अहिराणी भाषिकांचा गौरव करत अहिरानीत शुभेच्छा देखील दिल्या.

जात्यावरील ओव्या असू दे की, सण – उत्सवातील अहिराणी गीते…या भाषेची बोली ऐंकणा-यांच्या मनात आपूलकीची साखर पेरणी करते. दुस-या विश्व अहिराणी संमेलनाच्या निमित्ताने मायबोली अहिराणीचा गजर होतोयं. दि.२२ ते २४ जानेवारी २०२० या तीन दिवसात कथा, कविता, नाटिका, परिसंवाद, पर्यटन, संस्कृती, लोकनृत्य यांची सफर अनुभवता येणार आहे. तसेच भारताबरोबरच जगातील ३५ देशात विखुरलेले अहिराणी भाषिक व साहित्यिक यात सहभागी होणार आहेत. भाजपा सरकारच्या काळात कवयित्री बाहिणाबाईंच्या साहित्यकृतींचा सन्मान करतांना अनेक दशकांची मागणी असलेल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला त्यांचे नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय आम्ही घेतला. यामुळे अहिराणी भाषा व साहित्य संवर्धनाला गती मिळण्यास मदत झाली. याचेही मोठे समाधान असल्याचे प्रतिपादन देवेंद्र फडणवीस यांनी केले.

साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार मंगेश चव्हाण यांचे विशेष कौतुक केले. संमेलनाची जबाबदारी स्वीकारून माय अहिराणी भाषेचे पांग फेडण्याचा प्रयत्न त्यांनी केला, मला आता कळाले की, आमदार चव्हाण आजही त्यांच्या घरात आई वडील यांच्याशी अहिराणी मध्ये बोलतात, त्यामुळे बोलीभाषा जतन होते असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी सदैव खान्देशसाठी आणि अहिराणी भाषासाठी मी तत्पर आहे. आज जरी माझ्या भागात अहिराणी भाषा न बोलता तावडी भाषा बोलली जात असली तरी अहिराणी ही प्रमुख भाषा आहे आणि तिचा मला सार्थ अभिमान आहे आणि जगातील जवळजवळ तीस पस्तीस देशातील लोक दोन कोटी लोक जी भाषा बोलतात हे आपल्या सर्वांसाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे असं आपल्या वक्तव्यातून सगळ्यांना सांगितलं आणि अहिराणी भाषासाठी आणि खान्देशसाठी सर्वांना सर्वोतपरी सहकार्य करायला मी तयार आहे असं पण आश्वासित केलं.

संमेलनाचे स्वागताध्यक्ष आदरणीय मंगेश चव्हाण यांच्यामुळेच हा सोहळा एक पंचतारांकित जागेत मुंबईसारख्या एरियात संपन्न झाला आणि आपण अहिराणी भाषेला आज खरोखर न्याय देऊ शकतो असं वक्तव्य उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील यांनी केलं तसेच देवेंद्र फडणवीस आणि गिरीश भाऊ आणि उपस्थित मान्यवरांना अहिराणी अकॅडमी खान्देश भवन आणि अहिराणी भाषेला शेड्युल आठ मध्ये समाविष्ट करण्यासाठी मदत करण्याची विनंती केली. स्वागताध्यक्ष आदरणीय आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या मायबोलीचे ऋणनिर्देश आपण करायचेच आहेत. आपण याचे ऋण कधीच फेडू शकत नाही. यासाठी काम करणं ही आपली जबाबदारी आहे ती आपण पार पाडायला पाहिजे आणि सगळ्यांनी खान्देशी माणसांनी एकत्र होऊन संघटीत होऊन पुढे जाण्यासाठी कटिबद्ध व्हायला पाहिजे अहिराणी साठी मी सर्वोतपरी सहकार्य करेन आपण अहिराणीला राज्याच्या शेड्युल आठ मध्ये समाविष्ट करण्यासाठी जबाबदारी मा.देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतली याचा आम्हाला अभिमान आहे.

कोकण पदवीधर संघाचे आमदार अॅड. निरंजन डावखरे साहेब यांनीही आपला अहिराणी माणसांविषयी सुंदर बोधकथा सांगितली. लक्ष्मी व शनीमध्ये सुंदर कोण खान्देशी माणूस सांगतो की दोन्ही सुंदर आहेत लक्ष्मी येतांना आणि शनी जातांना. खानदेशी लोकं माझी मतदारच आहेत त्यांना मी सदैव मदत करण्यासाठी तयार आहे असं सांगितलं संमेलनाचे माजी अध्यक्ष बापूसाहेब पाटकर यांनी अहिराणी ची महती आणि महिमा अहिराणीच्या ओव्यांतून मांडली आणि खान्देशातली जी परिस्थिती आहे त्याच्यावर मान्यवर मंडळींनी लक्ष घालावं आणि मराठी साहित्यिकांना व मराठी भाषेलाही अनुदान मिळते मग अहिराणी भाषेच्या उपक्रमांनाहोते व साहित्यिकांना पण अनुदान मिळावे अशी उपस्थितांना विनंती केली संमैलनाध्यक्ष डॉक्टर एस के पाटील यांनी संपूर्ण संमेलनाची महती सांगितले आणि हे सगळं बघून मी भारावून गेलो आहे ओव्या सादर करून अहिराणीची महती सांगितले आणि मान्यवरांना अहिराणी साठी सहकार्य करण्याची विनंती केली त्यांनी स्वतः तुकारामाच्या गाथा आहिराणीत भाषांतर केलेली आहे. तसं विविध साहित्य इतरांनी अहिराणीत लिहावं आणि अहिराणी मध्ये इतर भाषांचाही उपयोग व्हावा असे आवाहन केला…!

सदर कार्यक्रम प्रसंगी खजिनदार ए.जी.पाटीलसर,परीषदेचे कार्याध्यक्ष बापुसाहेब पिंगळे, परीषदेचे विभागीय अध्यक्ष,मगन सुर्यवंशी,एन.एच .महाजन, विनायक पवार, उद्योजक प्रकाश बावीस्कर, भैय्यासाहेब पाटील,रवि पाटील, किशोर पाटील महिला आघाडी अध्यक्षा सौ. मानसी पाटील, विद्या अहिरे,भारती वानखेडेकर,सौ.सुनिता बोरसे, सुनंदा वाघ, सतिश पाटील,संजय पाटील, जितेंद्र वाघ, उपाध्यक्ष एल.आर.पाटील, प्रकाश पाटील,विजय पाटील साहित्यिक,लेखक,कवी व मायबोली आहिराणी वर प्रेम करणारे रसिक प्रेक्षक उपस्थित होते.बहारदार सूत्रसंचालन विनोद शेलकर, वैदेही पाटील, वर्षा पाटील यांनी केलं.पाहूण्यांचा परीचय व स्वागत मंडळाचे उपाध्यक्ष एन.एम.भामरे यांनी केलं.आभारप्रदर्शन मंडळाचे उपाध्यक्ष मा.श्री. प्रदिप अहिरे सरांनी केलं आणि अत्यंत सुंदर आणि संस्मरणीय कार्यक्रम संपन्न झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.