पुण्यात मुळशी पॅटर्न : बिल्डरची मुजोरी

चक्क शेतकऱ्यावर बंदूक उगारली

0

 

पुणे

 

पुण्याची प्रतिमा दिवसेंदिवस खालावत चालली आहे. पुण्यात रोजच गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात वाढलेली दिसून येतेय. पुण्यात हत्या, बलात्कार, कोयता गँग आणि हल्लीच झालेल्या ड्रग्स प्रकरणाने पुण्याची एक नकारात्मक ओळख निर्माण झाली आहे. या सर्व प्रकारांमुळे पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यानच, आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

 

पुण्यात दिवसाढवळ्या एका बिल्डरने एका शेतकऱ्याला बंदूक दाखवून धमकी देण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार त्या बिल्डरच्या ऑफिसमध्ये घडला असून त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. शहरात विश्रांतवाडीत घडलेल्या धक्कादायक प्रकाराने पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. आरोपी बिल्डरचं नाव प्रभाकर मोरे असे आहे.

 

नेमके प्रकरण काय?

रांजणगाव येथील एका शेतकऱ्याची जमीन प्रभाकर भोसले यांनी विकत घेतली होती. घरासाठी पैसे देतो म्हणून भोसलेंनी शेतकऱ्याला अर्धीच रक्कम दिली. नंतर पैसे दिलेच नाहीत. त्याचा जाब विचारण्यासाठी जेव्हा हा शेतकरी त्यांच्या ऑफिसमध्ये पोहोचला आणि त्यांना जाब विचारला तेव्हा, भोसले यांनी त्या शेतकऱ्यावर बंदूक ताणली. तिथे उपस्थित असलेल्यांनी भोसले यांना आवरलं म्हणून मोठा अनर्थ टळला. दरम्यान, प्रभाकर भोसलेंविरोधात संबंधित शेतकऱ्याने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.